अर्धवट व खराब रस्ताने घेतला एकाचा जीव; बसच्या दरवाज्याचे हुक तुटल्याने एकाचा मृत्यू

0 248

अर्धवट व खराब रस्ताने घेतला एकाचा जीव; बसच्या दरवाज्याचे हुक तुटल्याने एकाचा मृत्यू

 

कंधार (नितीन कोकाटे):  तालुक्यातील आंबुलगा शेल्लाळी जवळ मुखेड डेपोची बस क्र गाडी क्रमांक एम एच २०, बी एल १६१८ हे आज ता. २० जून रोजी सकाळी कंधारहुन मुखेडकडे जात असतांना या बस मधुन प्रवास करणारे कल्हाळी ता.कंधार येथील लक्ष्मण शेषेराव गायकवाड वय ४० वर्ष हा मुखेड गाडीने सावरगाव येथे सासरवाडीकडे जात होते पण खराब रस्तामुळे या बसच्या दाराचे हुक तुटल्याने व बस भरगच्च भरलेली असल्याने लक्ष्मण गायकवाड हे दारात उभा होते पण दरवाज्याचे हुक तुटले आणि ते बस बाहेर खाली पडले व जागीच त्यांचा मत्यु झाला.
सदर रस्ता हा राज्य महामार्ग असून कंधार वरून मुखेड ला जातो. हा रस्ता जवळपास मजबुतीकरन व डांबरीकरन झालेले आहे पण वनविभागामुळे आंबुलगा – शेल्लाळी पर्यतचा रस्ता बांधकाम विभाग व वनविभागाच्या वादात अडकल्याने हे तिन वर्षापासुन रस्त्याचे काम जवळपास एक , दोन कि.मी. चे काम अद्याप झाले नसल्याने ही घटना घडली असे बोलले जात आहे.वनविभागाच्या वादात अडकल्यामुळे या रस्ताचे काम तिन वर्षा पासुन रखडले आहे. या अगोदरही बरेच अपघात येथे झाले असून याची दखल कोणतेही वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित विभाग दाखल घेत नाही
अधिकारी व एजन्सी यांना या रस्तासाठी भेटून पण काहीच उपयोग झाला नाही बांधकाम विभागाकडे गेलो असता ते वनविभागाने हा रस्ता अडवला आहे तुम्ही गडकरीकडे जा असे उत्तर देतात या दोघाच्या वादात मात्र येथे अनेकाचे जिव जातात असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.