राज्यात विविध विभागातील पदभरतीचे शुल्क कमी करा संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0 120

राज्यात विविध विभागातील पदभरतीचे शुल्क कमी करा संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

मंगरुळपीर : राज्यात विविध विभागात रिक्त पदभरतीसाठी शासनाने जाहिरात काढली असून त्या पदभरतीचे शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड, मंगरुळपीरच्या वतीने तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुंजे, तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु, तालुका कार्याध्यक्ष हरीश गव्हाणे आदी उपस्थित होते.

सदर निवेदनात म्हटले आहे की, राज्यात वनविभागासह विविध विभागांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे.परंतु त्यासाठीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली असून भरती प्रक्रियेत शासन मालामाल तर बेरोजगार उमेदवार मात्र कंगाल होत आहेत.
राज्यात मोठ्या अवधीनंतर राज्य सरकारकडून विविध विभागांतील रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येत आहेत. यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे कंत्राट राज्य शासनाने कंपन्यांना दिले आहे. परंतु या कंपन्यांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी परीक्षा ९०० शुल्क केले आहे.

आधीच रोजगार नसलेल्या बेरोजगारांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यामुळेच हे परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व अर्जाची मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.