कोरोना लसीच्या दुष्परिणामामुळे दोघांचा मृत्यू ?

0 848

कोरोना लसीच्या दुष्परिणामामुळे दोघांचा मृत्यू ?

 

नागपूर : कोरोना लस घेतलेल्या व्यक्तीमध्ये त्यांचे दुष्परिणाम दिवसेंदिवस दिसत आहेत. केंद्र व राज्य सरकारने लस घेणे बंधनकारक करून लोकांना वेठीस धरत अनेक निर्बंध लादले त्यामुळे नागरिकांनी लसीचे डोस घेतले. त्यात पुणे बार असोसिएशनच्या दोन सदस्यांना कोरोना लसीमुळे हृदय विकाराचा धक्का बसून त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे लस बनविणा-या सदरील कंपन्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कौन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राईटचे अध्यक्ष बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी सांगितले की, पुणे बार असोसिएशनचे सदस्य असलेले अॅड. किशोर पाटील व अॅड. राजेश निरगुडे यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने नुकताच मृत्यू झाला आहे. या दोघांना अगदी तरुणपणात मृत्यू ला सामोरे जावे लागले. अॅड. किशोर पाटील व अॅड. राजेश निरगुडे यांनी लस घेतल्यानंतर यांना हृदयाचा त्रास वाढत होता. त्यातच या दोघा वकिलांचा काही दिवसांच्या अंतराने मृत्यू झाला.

तडकाफडकी मृत्यू झाल्यास पोस्टमार्टम करून सरकारने खरे कारण शोधणे तातडीने सुरू केले पाहीजे. कोणतीही मानवी चाचणी पुर्ण न करता अत्यंत घाईगर्दी व हिरोगिरी करून संपूर्ण देशाला जबरदस्तीने कोरोनाची लस देण्यात आली. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात लस घेणे ऐच्छिक असल्याचे सांगितले. दुसरीकडे लसीचे दोन डोज न घेणा-या व्यक्तींना शासकीय कार्यालयामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नव्हते. रेल्वे, विमान प्रवासात सुद्धा लस बंधनकारक केली होती. रेशन बंद करण्यात आले होते, थोडक्यात सगळीकडून कोंडी करण्यात आली होती, तरी सरकार तर्फे मात्र आता हात वर करण्यात येत आहेत. ही लस घेतलेल्या लोकांमध्ये आता त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. लसीकरणानंतर दररोज शेकडो तरुण ह्दय विकाराच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडले आहेत. मात्र, केंद्र सरकार या मृत्यूवर तोंड उघडण्यास तयार नाही.

लसीकरण करण्याचा आदेश काढणा-या अधिका-याला जबाबदार धरुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा – प्रकाश पोहरे

सरकारी धोरणामुळे अॅड. पाटील व अॅड. निरगुडे यांचा मृत्यू झाला आहे. त्याकरिता सरकार आणि लसीकरण करण्याचा आदेश काढणा-या अधिका-याला जबाबदार धरुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा असं देशोन्नती वृत्तपत्राचे मुख्य संपादक व अवेकन इंडिया मुव्हमेंटचे नेते प्रकाश पोहरे  म्हणाले. केंद्र व राज्य सरकारकारच्या लस सक्तीमुळे अनेकांना दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. हृदयविकार, मधुमेह, पॅरालिसिस असे जीवघेणे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे. या मृत्यूची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, अशी मागणीही प्रकाश पोहरे यांनी केली आहे. त्याकरिता सरकार आणि लसीकरण करण्याचा आदेश काढणा-या अधिका-याला जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. केंद्र व राज्य सरकारच्या लस सक्तीमुळे अनेकांना दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. हृदयविकार, मधुमेह, पॅरालिसिस असे जीवघेणे अजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे. त्या मृत्यूची जबाबदारी सरकारने स्वीकारावी. अशी मागणीही पोहरे यांनी केली आहे. लस बनविणा-या कंपनीवर त्यांनी १०, ००० कोटी रुपयांचा दावा त्यांनी ठोकला आहे हे येथे उल्लेखनीय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.