भाजीपाला दरवाढ झाल्यासच बजेट बिघडते तर भाजीपाला घेऊ नका

0 243

भाजीपाला दरवाढ झाल्यासच बजेट बिघडते तर भाजीपाला घेऊ नका !

लातूर : सध्या बाजारात भाजीपाल्यास समाधानकारक दर मिळून शेतक्यांच्या खिशात चार पैसे पडू लागले असतानाच दुसरीकडे सहाव्या सातव्या वेतन आयोगाच्या भलेगच्च पगार घेणा-या घरातील नौकदार कुटूंबातील गृहीणींच बजेट कोलमडल अशा अशयाच्या बातम्या प्रसारमाध्यात येऊ लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी तरुणांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यांचा वाढता आक्रोश नौकरदारवर्गाला प्रश्न करताना दरवाढ झाल्यासच बजेट बिघडते तर भाजीपाला खाऊच नका असे म्हणताना दिसत आहे.
टोमॅटो, कोबी परवडेना पोराला डब्ब्यात काय देणार अशी बामती एका नामांकित प्रसारमाध्यमाने प्रसारित केल्यानंतर शेतकरी आणि शेतकरी पुत्रामध्ये संतापाची लाट पसरली असून ते आक्रमक झाले आहेत. ज्यांना भाजीपाला महाग झाला वाटत असेल त्यांनी नौकरदारांच्या नजरेत बाजारात स्वत दिसणारा आणि मिळणारा पिजा, बर्गर किंवा स्वस्त वाटणा-या हाॅटेमधून आपल्या मुलाला डब्बा द्यावा ! किंवा तिथले अन्न पदार्थ आपल्या मुलांच्या डब्ब्यात देऊन कोलमडलेल बजेट व्यवस्थित करून घ्यावे असेही तरूण शेतकरी या गृहीणींना सोशल मिडीयावर बोलताना दिसत आहेत.
शेतक-यांचा कांदा शेतात सडला त्यावेळी आमचे बजेट बिघडल म्हणून आम्ही कधी एवढी बोंब मारली नाही, तेवढी आज तुम्ही चार दोन रुपयांसाठी मारता तर मग भाजीपाला विकत घेता तरी कशाला ? असा प्रश्नही शेतकऱ्यांच्या घरातील तरुणपिढी बोलताना दिसत आहे. आज पाच रूपये प्रति किलोने भाजीपाल्याचे दर वाढल्यासच सहावा सातवा वेतन आयोग उचलण्या-या नौकरदारांच बजेट कस काय कोलमडल हा नवीनच प्रश्न समस्त शेतक-यांसमोर पडला आहे असही आनंदवाडीचे शेतकरी पुत्र व बीआरएसचे कार्यकर्ते कपील धावड यांनी विचारला आहे.
भाजीपाल्याच्या दरात थोडीसी वाढ झाल्यास शहरातील गृहीनींना डब्यात काय द्यावे अशी चिंता सतावत असेल तर त्याची काळजी शेतक-यांनी का घ्यावी ? आमच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आमच्या घामाने पिकविलेला शेतमाल घरात तसाच तसाच पडून आहे त्याची चिंता तुम्हाला कधीच का वाटत नाही ? आम्हा शेतकरी कुटुंबातील गृहीणींच बजेट मागील कित्येक दिवसांपासून कोलमडल आहे याकडे कधी कोण लक्ष देत नाही त्यांच तुम्हाला काहीच सोयरसुतक कधीच का वाटत नाही सुटाबुटात रहाणारांनो असं शेतकरी खुली चर्चा करताना म्हणत आहेत.

भाजीपाला दर (प्रतिकिलो)
भाजीपाला        मागिल दर      सध्याचे दर (रुपये)
टोमॅटो                     ३०             ४०
वांगे                         ४०             ४०
फुलकोबी                   ४०             ८०
पत्ताकोबी                   ४०              ८०
मिरची                        ५०             ८०
बटाटे                          २०              २०
मेंथी                           २०              २०
शेपू                             २०              २०
किरकोळ भाववाढ
प्रसामाध्यमातून भाजीपाला महाग म्हणून येण्या-या बातम्यात तेवढ तथ्य नसते, कारण भाजीपाला दरात झालेली दरवाढ ही किरकोळ असून यामुळे कोणाच्या घरातील बजेट कोलमडेल असे आम्हाला वाटत नाही कारण आता कुठ शेतक-यांना थोडासा मोबदला मिळत आहे अस भाजीपाला खरेदी करणारे व्यापारी म्हणत आहेत.
भाजीपाला महाग नाहीच
सध्या बाजारात भाजीपाल्याचे जे दर आहेत ते योग्य आहेत, कारण ते उत्पादीत करण्यासाठी आम्हाला लागणारी मेहनत कमी वाटते का या नौकरदारवर्गाला ? ज्यांना भाजीपाला महाग वाटत असेल त्यांनी तो खाऊ नये अस उत्कृष्ट शेतकरी म्हणत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.