बर्ड फ्लू नवीन साथीचे कारण बनू शकतो – रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचा इशारा

0 16

बर्ड फ्लू नवीन साथीचे कारण बनू शकतो
– रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचा इशारा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बर्ड फ्लूबाबत जगभरात चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी सांगितले की, टेक्सासमधील एका व्यक्तीला एव्हीयन इन्फ्लूएंझा किंवा बर्ड फ्लूची लागण झाली आहे. विषाणूची लागण झालेल्या गायींच्या संपर्कात आल्यानंतर त्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाली. हा विषाणू मानवामध्ये आढळल्यानंतरही याबाबत सतत चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, बर्ड फ्लू नवीन साथीचे कारण बनू शकतो.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू संभाव्यपणे साथीच्या रोगास कारणीभूत ठरू शकतो आणि तो कोविडपेक्षा १०० पट वाईट असू शकतो. अशा परिस्थितीत आता गायी आणि कोंबडी या दोन्हींच्या संपर्कात आल्यानंतर लोकांना विषाणूची लागण झाल्याचे पाहता, आता दूध पिणे किंवा कोंबडी आणि अंडी खाणे सुरक्षित आहे का?, असा प्रश्न निर्माण होतो. याबद्दल मेट्रो हॉस्पिटल, नोएडा येथील इंटरनल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सैबल चक्रवर्ती म्हणाले की, डॉक्टर म्हणतात की बर्ड फ्लूच्या प्रादुभार्वाच्या वेळी संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी, अंडी आणि चिकन योग्य प्रकारे शिजवलेले असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे तयार केलेल्या पोल्ट्री उत्पादनांमधून बर्ड फ्लूचा प्रसार होण्याची शक्यता खूपच कमी असली तरीही, संभाव्य संक्रमण टाळण्यासाठी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.