संघी पोलिटिकल किड्यानं केला ‘किडा’

0 190
संघी पोलिटिकल किड्यानं केला ‘किडा’

 

रेपे नवनाथ दत्तात्रय
मो. ९७६२६३६६६२

 

२०१४ साली ‘चला घेऊ शिवछत्रपती का आशिर्वाद आणि मोदींना देऊ साथ’ असे दिवसरात्र ओरडणारेच संघी किडे जेव्हा सत्तेच्या खुर्चीत बसले तेव्हापासून यांना छ. शिवाजी महाराजांचा विसर पडला आणि खुर्चीची गर्मी लागून महापुरुषांविषयी अवमान करण्याचा मुळव्याध जडला का ? असा प्रश्न पडतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारं ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी‘ हे पुस्तक भाजपचे नेते विजय गोयल यांनी लिहिलं होतं. तेव्हा म्हणावेसे वाटते की, ‘संघी पोलिटिकल किड्यानं केला ‘किडा’.
कुळवाडी भूषण रयतेचे राजे तसेच तरुणांना प्रेरणा देणारे महापुरुष विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाचे लेखन भाजप नेते जय भगवान गोयल यांनी करून त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात केले.
पुस्तकावर टिका करताना आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘जगाच्या अंतापर्यंत दुसरे शिवाजी होणे शक्य नाही, तर ‘हा अट्टाहास करु पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. छगन भुजबळ म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. एखाद्याने किती भाटगिरी करायची याला काही मर्यादा असतात. तर भाजपचे हळवणकर हे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलाना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो. या तुलनेत काहीही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचे यांनी म्हटले आहे. तर मग हळवणकर यांना सांगावे वाटते की, रामदासांचा आणि सावरकरांचा उदो उदो करणारी जमात मग मोदींची तुलना थेट सावरकरांशी आणि लग्नमंडपातून पलायन करणा-या रामदास यांच्याशी करायाला आमच्या बहुजन समाजाचा काहीही विरोध नाही. पण छ. शिवाजी महाराज यांच्या नकाचीही बरोबरी करु न शकणा-या मोदींची तुलना होऊ शकते का ? तसेच सुरेश हाळवणकर याच्या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडचे पुणे, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले की, जो लेखणीशी बेमानी करेल… तो गद्दार असेल. म्हणून ‘जयभगवान गोयल हा देश का गद्दार…!’ जय भगवान गोयल व हा भाजपचा प्रदेश सरचिटणीस हळदणकर हे देशाचे गद्दार म्हणून जाहीर… ह्या उर्मट लोकांची जीभ छाटली पाहिजे. त्यापुढेही ते म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना फक्त… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत’च होऊ शकते…!.
तसेच भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले की, काँग्रेस ज्याप्रमाणे गांधी आणि नेहरूंच्या विचाराने चालतात त्याप्रमाणे नरेंद्र मोदी शिवरायांच्या विचारानं चालत आहेत. महाराजांच्या विचारांवर चालणं काही चुकीचं नाही मात्र त्यांची शिवरायांशी तुलना होवू शकत नाही. तेव्हा खडसे यांना विचारावे वाटतो की, शिवरायांचा अवमान होतो तेव्हा तुमचे ‘रंगा आणि बिल्ला’ कुठं आणि नेमकं काय करतात.
त्यानंतर महाराष्ट्रासह भारतात याचे जोरदार पडसाद उमटले. आता तो वाद मिटतो ना मिटतो तोच शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने शिवभक्त चांगलेच भडकले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आली आहे. कोंढाणा किल्ला घेताना धारातिर्थी पडलेल्या तानाजी यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले होते. त्यानंतर, कोंढाणा या किल्ल्यास सिंहगड असे नाव देण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून सिंहगड गणला जातो. महाराष्ट्राच्या रणभूमीत तानाजी मालुसरेंनी पराक्रम गाजवला होता. पण दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाॅलिटिकल किडा या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच उदयभान राठोड यांच्या चेहऱ्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे. अशा संघी किड्यांना सांगावे वाटते की, सर्कशीतील वानराला मानवाचे कपडे घातले म्हणजे तो काय मानव होतो का ? यापुर्वीही नरेंद्र मोदींची तुलना प्रभू रामचंद्राशी केली होती तर एका सिनेअभिनेत्याने मोदी शहांची तुलना ‘कृष्ण – अर्जून’ यांच्याशी केली होती. तेव्हा सांगावे वाटते की, मोदी शहांची तुलना ‘सावरकर – रामदास’, ‘आसाराम- रामरहीम’, ‘गोळवलकर-हेडगेवार’ यांच्याशी करायला काय कोणाची हरकत आहे का ? पण जर तुम्ही आमच्या बहुजन महापुरुषांबरोबर तुमच्या विकृतींची तुलना करत असाल तर योग्य नाही कारण तुमची ती पात्रता नाही. छ. शिवाजी महाराजाचं नाव घेऊन मतांचा जोगवा मागणारे तुम्ही विश्ववंद्य शिवरायांची बरोबरी करता का ? सवरकार – रामदास, गोळवलकर – हेडगेवार यांच्या नावाने मते मागून ‘मी सावरकर’ ‘मी हेडगेवार’, मी’ रामदास’ ‘मी परसूराम’ किंवा ‘आज कें परशुराम नरेंद्र मोदी‘ तसेच ‘आज कें सावरकर नरेंद्र मोदी‘, ‘आज कें हेडगेवार नरेंद्र मोदी‘ असं पुस्तकाचं नाव द्यायला काय सावरकर हेडगेवार गोळवलकर रामदास यांचा विरोध होता का ?
छ. शिवाजी महाराजांची व तानाजी मालुसरे यांची वेशभूषा परिधान करून व्हिडिओ पसरवणे म्हणजे हा
छत्रपती शिवराय आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या तानाजी मालुसरे यांचा अपमान आहे, अशा संतप्त भावना ट्विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर शाब्दिक निशाणा साधताना म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या फोटोचा वापर निवडणुकीच्या प्रचार रॅलीमध्ये केला जात आहे. त्यावर आता महाराष्ट्रातील प्रमुख नेते, ज्यांना असं वाटतं की छत्रपतींवर बोलण्याचा त्यांनाच अधिकार आहेत ते गप्प का बसले आहेत ?, छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे, जगाचे युगपुरुष आहेत. आमचे ते दैवत आहेत. आमचा जीव गेला तरी चालेल मात्र छत्रपतींचा अपमान आम्हाला चालणार नाही. जर कुणी अपमान करत असेल आणि विनाकरण आम्हाला प्रश्न विचारत असतील तर आज ते का शांत बसले आहेत ? असही म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत पाटील म्हणाले की,
त्या व्हिडीओशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडिओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजपा या व्हिडिओचा निषेध करत आहे. या व्हिडिओवरून भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, अशी भाजपाची भूमिका आहे.
भाजपचे सहयोगी खासदार संभाजीराजेंनी आक्रमक होत म्हणाले की, ‘आता हे अति होतंय….!’ पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करुन हे जे कुणी आहे, त्यावर लवकरात लवकर कारवाई करा. आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी.
गांधीनगरमध्ये इंस्टिट्यूट ऑफ स्किल्सच्या भूमीपूजन कार्यक्रमात रतन टाटा म्हणाले की, मोदी-शहांकडे एक व्हिजन आहे, त्यांना साथ दिलीच पाहिजे असं म्हणाले पण यावेळी आठवण होते ती म्हणजे वामनदादा कर्डक यांची कारण त्यांनी एक भाकित केले होते की, ‘२०२० नंतर टाटा बाटाच जगतील बाकी सगळेच मरतील’  तसेच
‘टाटा बाटा तुमचा धनाचा साठा कुठं हाय ओ,
अन् सांगा आम्हाला आमचा वाटा कुठं हाय ओ’
कारण देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी करणा-या व्यक्तीला साथ द्या म्हणणा-या टाटांना आता तरुणांनी वामनदादाच्या भाषेत प्रश्न करावेसे लागतील.
एका पुस्तकात माफीवीर सावरकरांची बदनामी झाली म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक मुखांनी ‘मी सावरकर… मी सावरकर… म्हणून बोंबलणारे…! आमचे बहूजनातील काही पाळीव प्राणी दिसले पण शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक लिखाण झाले तेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमचे बहुजनातील पाळीव प्राणी काय सज्जनगडावर लंगोटी घालून बसले की दिनकराव जवळकर म्हणतात त्याप्रमाणे गांजा फुकत बसले का ? मग अंदमानातील कोठडीत भिंतीवर रेघोट्या मारीत बसले का ? हाच रामदासी सेवा संघाचा आणि त्यांच्या भाजपचा आहे. हे आतातरी समजून घेणे काळाची गरज आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.