कोव्हिड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास, त्यामुळे मी लस घेतली नाही  – आमदार प्रणिती शिंदे यांचेकडून लस न घेतल्याची कबूली 

0 1,249
कोव्हिड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास, त्यामुळे मी लस घेतली नाही
 – आमदार प्रणिती शिंदे यांचेकडून लस न घेतल्याची कबूली 
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडून दावे-प्रतिदावे करताना पाहायला मिळत आहे. मोदींच्या पक्षाला १०० कोटी दिले, त्यामुळेच सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लसीचं कंत्राट मिळालं, असा गंभीर आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. यासोबत कोव्हिड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास, त्यामुळेच मी लस घेतली नाही, असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावभेटी करत असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपण स्वत: लस न घेतल्याची एक प्रकारे कबुली दिली आहे. कोविड वॅक्सिनमुळे ज्यांना काही दुखणे नव्हते, अशांना देखील बीपी, शुगर हृदयविकार झाल्याचे त्यांनी शुक्रवारी सांगितले. त्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना देत लोकांशी संवाद साधत कोरोना लसीच्या दुष्परिणामांची माहिती सांगितली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना आमदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या गावभेट दौºयादरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या या दाव्यांनं सर्वांचे लक्ष वेधले आहे. सरकारने वॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे लोकाना जबरदस्ती केली, असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी इलेकट्रोल बॉण्डच्या मुद्यावरून मोदीवर टीका करताना कोरोना वॅक्सिन संदर्भात दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काल स्टेट बँकेवरती ताशेरे ओढले, इलेक्टरोल बॉण्डचा खुलासा करायला सांगितलं. यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले, त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आलं. आपल्याला ज्या सीरम कंपनीची कोरोना वॅक्सिन जबरदस्तीने दिली. सीरम कंपनीने देखील १०० कोटी रुपये भाजपला दिले आहेत, आपल्याला मारण्यासाठी. टेन्शन नका घेऊ पण आपल्याला वॅक्सीन जबरदस्ती का केलं, कारण सरकारने वॅक्सीन विकत घेतलं. तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी सरकारने वॅक्सिन विकत घेतलं. तुम्हाला त्या वॅक्सिनसाठी जबरदस्ती केली आणि त्यामुळे आज कोणाला काही ना काही दुखणं सुरू झालं आहे.
वॅक्सिनमुळे बीपी, शुगर हृदयविकार
ज्यांना काही दुखणे नव्हते, अशांना देखील कोविड वॅक्सिनमुळे बीपी, शुगर हृदयविकार झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना देत लोकांशी संवाद साधत कोरोना लसीच्या दुष्परिणामांची माहिती सांगितली.
एकमेव देश जिथे वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो
ज्यांना काहीच नव्हतं अशांना देखील काही ना काही बीपी, शुगर, हृदयविकार चालू झाले, मी तर वॅक्सिन घेतलीचं नाही. मी खरेच वॅक्सिन घेतलं नाही, मोदींचे फोटो असताना मी कशासाठी घेऊ? आपला एकमेव देश आहे जिथे वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो होते, असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला.
Leave A Reply

Your email address will not be published.