सावरगाव येथून लोकसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार – मराठा समाजाचा बैठकीत निर्णय

0 45

सावरगाव येथून लोकसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार
– मराठा समाजाचा बैठकीत निर्णय

तुळजापूर : तालुक्यातील सावरगाव येथे बुधवार दि.१३ रोजी सकल मराठा बांधवांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत गावातून दोन उमेदवार देण्यासंदर्भात व मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ निर्णय झाला. ही दुसरी बैठक होती.
बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यामध्ये गावामधून येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी २ उमेदवार देण्याचे व त्याचा सर्व खर्च लोकवर्गनीतुन करण्याचे ठरले आहे. जो पर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात शासन ठोस निर्णय घेत नाही. मराठा समाजाचे समाधान होत नाही. तोपर्यंत गावात कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम होऊ द्यायचा नाही. सुखदु:खांची परिस्थिती वगळता गावामध्ये सर्व पक्षीय राजकीय पुढाºयांना गावबंदी असेल. गावामध्ये गावातील पुढारी वगळता कोणाचेही बॅनर लावू दिले जाणार नाहीत. त्या बॅनरवर कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख असता कामा नये. विनाकारण कोणी दबाव तंत्राचा सुडबुध्दीने वापर करत असेल तर गनिमी काव्यानेच उत्तर देण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.