हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती – करकरेंना का व कोणी मारले? या पुस्तकाचा संदर्भ देत काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केलेल्या दाव्याने खळबळ

0 96

हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती
– करकरेंना का व कोणी मारले? या पुस्तकाचा संदर्भ देत काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केलेल्या दाव्याने खळबळ

 

कोल्हापूर : मुंबईवरील २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याच्यावेळी शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, असे वक्तव्य एस.एम. मुश्रीफ यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या आधारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. मात्र या वक्तव्यावरुन भाजप नेत्यांकडून गदारोळ केला जात आहे. या विरोधाला भीक न घालता वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण देताना, हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, हे माझे वक्तव्य एस.एम. मुश्रीफ यांनी लिहलेल्या करकरेंना का व कोणी मारले या पुस्तकाच्या आधारे केले असल्याचे सांगितले. वडेट्टीवार हे रविवारी रोजी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकारपरिषदेत बोलत होते.

हेमंत करकरे साहेबांनी हिंदुत्ववादी व हिंदुत्वाच्या नावावर विकृत विचारसरणी पेरणाऱ्या भगव्या दहशतवाद्यांचा खरा चेहरा ‘टरा-टरा’ फाडून टाकला होता. म्हणून ‘शहिद हेमंत करकरे साहेबांना मारल्यामुळे प्रज्ञासिंग साध्वीचं सुतक संपलं…?’ याचा अर्थ करकरे साहेबांना मारणारे मास्टर माइंड व साध्वीचे बोलवते धनी आरएसएसरुपीच आहेत हे स्पष्ट होते.
या पत्रकारपरिषेत विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर तोशेरे ओडले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तेव्हा निकम यांना म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याचे गरज नाही. तालुका लेव्हलच्या बेलआऊट करणाºया वकिलानेही हा खटला लढवला असता तरीही कसाबला फाशी झाली असती. कारण कसाब हा दहशतवादी होता. त्यामुळे त्याला फाशी झालीच असती. त्यामुळे यामध्ये उज्ज्वल निकम यांनी डिंग मारण्याचे किंवा बडेजाव मिरवण्याचे कारण नाही, असे विलासराव देशमुख यांनी म्हटले होते. विलासराव देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांना तेव्हाच ओळखलं होतं, असे टोला वडेट्टीवार यांनी भाजपचे उमेदवार निकम यांना लगावला. यावेळी आम्ही जे काय बोललो आहोत, त्याविषयी उज्ज्वल निकम यांनी खुलासा करावा. या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव नक्की आहे, असेही ते म्हणाले.

उज्ज्वल निकम यांना लोकसभेत न पाठविता जेलमध्ये पाठवावे लागेल – माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांचा घणाघात
पुरावे लपवणारा देशद्रोही उज्ज्वल निकम
हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकाºयाच्या पिस्तुलमधील होती. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर मात्र भाजप देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले होते.

विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला. थोडी तरी लाज बाळगा, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

संविधानावर दरोडा घालू पहाणा-या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग अभिनेते किरण मानेंचा उज्वल निकम यांच्यावर घणाघात

पोलीस महानिरीक्षक पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं
किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले की, उज्ज्वल निकम यांना खरंतर लोकसभेत न पाठविता जेल मध्ये पाठवायला हवं. असं माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ म्हणाले ! का म्हणाले असतील? पोलीस महानिरीक्षक हे साधं पद नाही भावांनो. या पदावरचा माणूस जे बोलतो ते हलक्यात घेण्यासारखं नसतं. एस.एम. मुश्रीफ यांनी रिटायरमेन्ट नंतर कुठल्या पक्षाची लाचारी करत आमदारकी खासदारकीची भिक नाही मागीतली. त्यांनी एक पुस्तक लिहीलं… ‘करकरेंना का व कोणी मारले?’
हल्ल्याची माहिती १९ नोव्हेंबर २००८ मिळाली मात्र ती जाणिवपूर्वक दाबली
किरण माने पुढे म्हटले की, ‘त्या पुस्तकात त्यांनी काही सिक्रेटस ओपन केली आहेत. मुश्रीफसाहेब म्हणतात, पाकिस्तानच्या लष्करे तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली आहे, याची डिटेल माहिती अमेरीकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला १९ नोव्हेंबर २००८ रोजीच मिळाली होती. त्या बोटीचे अक्षांश व रेखांशही समजले होते. पुढील कारवाईसाठी ही माहिती मुंबई पोलीस, महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळवण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर अलोक यांची होती. पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळविली नाही आणि हा हल्ला होऊ दिला.’

Leave A Reply

Your email address will not be published.