देशद्रोहाचा खरा चेहरा…!

हेमंत करकरे साहेबांनी हिंदुत्ववादी व हिंदुत्वाच्या नावावर विकृत विचारसरणी पेरणाऱ्या भगव्या दहशतवाद्यांचा खरा चेहरा 'टरा-टरा' फाडून टाकला होता. म्हणून 'शहिद हेमंत करकरे साहेबांना मारल्यामुळे प्रज्ञासिंग साध्वीचं सुतक संपलं...?' याचा अर्थ करकरे साहेबांना मारणारे मास्टर माइंड व साध्वीचे बोलवते धनी आरएसएसरुपीच आहेत हे स्पष्ट होते.

0 422

देशद्रोहाचा खरा चेहरा…!

 

रेपे नवनाथ दत्तात्रय
संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू या पुस्तकाचे लेखक

मुंबईवर २६/११ च्या झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हेमंत करकरे, विजय साळसकर व अशोक कामठे शहीद झाले. देशासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्या दहशतवाद्यांनी त्यांना मारलं त्या दहशतवादाचा खोटा चेहरा भारतातील लोकशाही व न्यायव्यवस्थेनी ठेचला. परंतू , त्या हेमंत करकरे साहेबांनी हिंदुत्ववादी व हिंदुत्वाच्या नावावर विकृत विचारसरणी पेरणाऱ्या भगव्या दहशतवाद्यांचा खरा चेहरा ‘टरा-टरा’ फाडून टाकला होता. म्हणून ‘शहिद हेमंत करकरे साहेबांना मारल्यामुळे प्रज्ञासिंग साध्वीचं सुतक संपलं…?’ याचा अर्थ करकरे साहेबांना मारणारे मास्टर माइंड व साध्वीचे बोलवते धनी आरएसएसरुपीच आहेत हे स्पष्ट होते. शहीद करकरे साहेबांचा अपमान करणाऱ्या साध्वी देशद्रोही असून तिची ‘जिभ’ छाटली पाहिजे असे संभाजी ब्रिगेड पुणे, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी असे म्हटले आहे.

संविधानावर दरोडा घालू पहाणा-या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग अभिनेते किरण मानेंचा उज्वल निकम यांच्यावर घणाघात
‘हू किल्ड करकरे…’! याचा अर्थ शहिद करकरे, कामठे व साळसकर साहेबांना मारणारे खरे आरोपी कोण आहेत हे भारतासमोर आलं पाहिजे. ‘हू किल्ड करकरे…’ या पुस्तकामध्ये मुश्रीफ साहेबांनी मांडलेली प्रत्येक गोष्ट आज प्रज्ञासिंग साध्वीच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. भारताचे जर कोणी दहशतवादी असतील तर प्रज्ञासिंग साध्वी व तिचे मास्टर माईंड आहेत हे मुश्रीफ साहेबांनी स्पष्ट केलही आहे तसेच होतही आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञासिंग साध्वी होती. अन्य ठिकाणच्या बॉम्बस्फोटाचे व दहशतवादी हल्ल्याच्या गटांमध्ये सुद्धा साध्वीचा हात होता. ही देशद्रोही व्यक्ती भाजपकडून भोपाळमध्ये उमेदवारी ‘भाजप’ देते व ती घेते हेच या देशाचे दुर्दैव आहे. भाजपचा खोटा देशभक्तीचा भुरका आज प्रज्ञासिंग साध्वीने स्वत:च टरा-टरा फाडून टाकलेला आहे. अशा देशद्रोही व्यक्तीचे भाजप नेते व मा. पंतप्रधान उमेदवारी देऊन समर्थन करतात हे या देशांमध्ये हिटलरशाही प्रस्थापित करण्याचे उत्तम उदाहरण आहे. मा. पंतप्रधान व भाजपच्या सर्व नेत्यांनी प्रज्ञासिंग साध्वीची तात्काळ उमेदवारी रद्द करावी. तसेच ‘निवडणूक आयोगाला’ विनंती की साध्वी’ची उमेदवारी रद्द केली पाहीजे व केंद्र सरकारने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहीजे. कारण प्रज्ञा सिंग साध्वीच्या वक्तव्यातून समाजा – समाजामध्ये तेढ निर्माण होऊन धार्मिक आणि जातीय द्वेष पसरवण्यात येत आहे. हा मनुवादी प्रकार आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीवर व भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रचंड वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. याविषयी सेक्रेड गेम्सचा लेखक म्हणतो की, ह्यङ्घमग तर कसाब साध्वी प्रज्ञा यांचा साथीदारचह्ण तर वरुणने ट्विट केल की, मी नि:शब्द झालोय. भाजपाच्या भोपाळच्या उमेदवार आणि दहशवादच्या आरोपी उघडपणे २६/११ चे हिरो हेमंत करकरे यांच्या मृत्यूची कामना करतात. मग तर, कसाब साध्वी प्रज्ञा यांचा साथीदारच,’ आहेत.
हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांनी अत्यंत धक्कादायक वक्तव्य करताना म्हणतात की, ‘हेमंत करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवलं होतं. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले,’ असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

गो भक्तांचे पापा गोमांस का खाता? लेखक नवनाथ रेपे
साध्वी उलट्या बोंबा मारताना म्हणते की, मी माफी मागितली, माझा छळ करणारे माफी मागणार का? तर शहिदांचा अपमान होईल, असे वागू नका, भाजपला सावरुन घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले आहे. साध्वींचे मत हे वैयक्तिक असल्याचं सांगत त्यांना पाठिशी घालण्याची भूमिका भाजपने घेतलीय. तर या वक्तव्याचा निषेध करायचा की समर्थन करायचं, यावरून शिवसेना गोंधळल्याचं दिसत आहे. देशभरात संतापाची लाट उसळली ती साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या बेजबाबदार वक्तव्यानं. त्यानंतर काही तासांत प्रज्ञासिंहांनी माफी मागितली.

हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती – करकरेंना का व कोणी मारले? या पुस्तकाचा संदर्भ देत काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केलेल्या दाव्याने खळबळ
साध्वी प्रज्ञासिंह यांचं हे विधान संतापजनक तर आहेच. मात्र तमाम भाजपा नेत्यांचा त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार त्याहूनही धक्कादायक आहे. प्रज्ञासिंह यांचं विधान आक्षेपार्ह आहे की नाही, हे ठरवायला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मात्र २४ तास लागतात. त्यातही भाजपाचा कॉपीराईट असणारा ‘पार्टी विथ डिफरन्सचा’ गुण शिवसेनेतही झिरपल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरेंनी साध्वीच्या वक्तव्याचा निषेध केला, तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी मात्र साध्वीचं विधान समजून घेण्याचा उपदेश केला आहे. आहो ‘म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो’ अशी म्हण आहे. साध्वीच्या वक्तव्यापेक्षा त्यांच्या वक्तव्याचं समर्थन आणि त्यांची भोपाळची उमेदवारी या बाबी देशाच्या इतिहासात ‘आणखी एक भोपाळ दुर्घटना’ म्हणून नोंदवली जाण्याची चिन्हं आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी आणि भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन वाद झाल्यानंतर प्राज्ञासिंह यांनी माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राज्ञासिंह यांना शहीद हेमंत करकरे प्रकरणावरुन प्रश्न विचारण्यात आला असता साध्वी प्रज्ञासिंह ह्या मुलाखत अर्ध्यातच सोडून निघून गेल्या. ट्विटवर या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरलही झालेला आहे. त्यामध्ये टीव्ही ९ भारतवर्ष या वाहिनीला साध्वी प्रज्ञासिंह लाइव्ह मुलाखत देत होत्या. त्यावेळी मुलाखत घेणाऱ्या अजित अंजुम यांनी प्रज्ञासिंह यांना करकरे प्रकरणावर प्रश्न विचारला. ‘करकरे प्रकरणात तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही कोर्टात किंवा तुमचे शुभचिंतक असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह किंवा महाराष्ट्र सरकारकडे का गेला नाहीत?’, असा थेट सवाल वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक असलेल्या अंजुम यांनी विचारला. मात्र अंजुम यांच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी प्रज्ञासिंह यांनी मुलाखतीमधून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. अंजुम प्रश्न विचारत असतानाच प्रज्ञासिंह यांनी आपले मायक्रोफोन्स काढून ठेवत जागेवरुन उठून निघून गेल्या.
आता तर ‘नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि हेमंत करकरे हे आमचे शत्रूच होते कारण की, त्यांनी हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेतली असे विधान पुनाळकरांनी केले तर त्यांच्या हत्येशी आमच्या साधकांचा अजिबात संबंध नाही,’ असेही म्हणतात. ‘आमच्याविरोधात बोगस साक्षीदार उभे करून सीबीआय आम्हाला बदनाम करत आहे,’ असा आरोप सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळकर यांनी केला आहे.
वीरेंद्र तावडे याच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ‘सनातन’ ने सध्या आपली बाजू मांडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघात आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पुनाळकर यांनी वरील वक्तव्य केले. तसेच सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांनी ‘सनातन’च्या विरोधात कट रचला आहे. संजय साडविलकर या बोगस साक्षीदाराला उभं करून आम्हाला बदनाम केलं जात आहे,’ असा आरोप ‘सनातन’चे प्रवक्ते अभय वर्तक यांनी यावेळी केला आहे.

उज्ज्वल निकम यांना लोकसभेत न पाठविता जेलमध्ये पाठवावे लागेल – माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांचा घणाघात
आज साध्वी शहीद करकरेविषयी वादग्रस्त वक्तव्य करते तर पंतप्रधान लोकसभा निवडणुकीत शहीद झालेल्या जवानांचा वापर करून मते मागताना तर कधी सैनिकांपेक्षा व्यापारी जास्त साहशी आहे असे म्हणून सैनिकांना हीन लेखतात त्याच शहीद जवानांना महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष हे अतिरेकी संबोधतात याशिवाय पंढरपुर विधानपरिषदेचे आमदार हे सैनिकांच्या पत्निविषयी अपशब्द बोलतात. तर ‘नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि हेमंत करकरे’ हे आमचे शत्रू होते असे सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळकर म्हणतात. मग खरा प्रश्न पडतो की, देशाचे खरे देशद्रोही दुसरे तिसरे कोणी नसून हेच मनुवादी विचारांचे चेहरेचं आहेत.

सदरील लेख २६ एप्रिल २०१९ रोजी बामसेफचे दैनिक मूलनिवासी नायक मध्ये प्रकाशित झालेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.