गोभक्तांचे पापा गोमांस का खाता ?

0 1,867
गोभक्तांचे पापा गोमांस का खाता ?
✍🏻 नवनाथ रेपे
   ‘भट बोकड मोठा’
या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला म्हणून तत्कालीन मनुच्या व्यवस्थेने आरोळी ठोकत त्या पाण्यात पंचगव्य (गायीचे शेण, मूत्र, दूध, तूप) टाकून ते पाणी शुध्द करण्याचा महाप्रताप केला होता. म्हणजे पाणी शुध्द करण्याची ताकद गायीच्या मुतात आहे हा शोध केवळ ब्राम्हणी व्यवस्थेचे दलाल भडवेच लावू शकतात कारण त्यांच्या डोक्यात गोमुत्राशिवाय आहे तरी काय ? गाय आम्हा शेतक-याला प्रिय आहे त्यामुळे तीचा काय आणि किती उपयोग होतो हे तथाकथित धर्माच्या ठेकेदारांनी आम्हा बहुजनांना शिकवू नये. पण ज्यांच्या घरी एकही गाय नाही, जे गायीला चारा टाकत नाही, जे गायीची धार काढत नाहीत ते आम्हाला गायीच तत्वज्ञान हेपलून आमच्यापुढे गोमाता गोमाता करून आरोळी ठोकतात तेव्हा हसू येत. कारण ज्यांच्या घरी गाय नाही त्यानांच गोमुत्राची आवड असते, ज्यांच्या घरी गाय असते ते तर दुध खातात. गायीच गोमुत्र पिणारे भडवे मात्र लोक गायीची हत्या करून तीच मांस भक्षण करत होते याचे पुरावे अनेक पुराण ग्रंथात आहेत त्यांच्याविषयी काहीच का बोलत नाहीस ? गोरक्षणांच पेटंट हे बौध्द धर्मियांच होत, पण ते पेंटट चोरणारे नेमके कोण ? ते चोर एकीकडे गोरक्षणाची भाषा करतात तर दुसरीकडे गोमांस भक्षणाची शिकवण देणारे धर्मग्रंथ डोक्यावर घेऊन मिरवतात. स्वतः गोभक्त म्हणणारे हे भडवे का ह्या धर्मग्रंथाची होळी करत नसतील हे तर उघडाबंब रामदासच जाणो.
भाजपा हा राजकीय पक्ष नसून एक विघ्नसंतोषी विकृतींची टोळी आहे ? ह्या टोळीसाठी आपली चोळी खाली उतरून नंगानाच करताना काही बहुजनातील मनोरुग्न महीला दिसतात. त्यांना शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महीला मुलींचे प्रश्न म्हत्वाचे वाटत नाहीत मात्र हनुमान चालीसा म्हत्वाची वाटते. करण हनुमान चालिसेने सर्व प्रश्न मार्गी लागणार असतील हे तर मायमा-या परशुरामच जाणो. वेद, पुराण, रामायण व महाभारतात पानापानावर गोहत्या व गोमांस भक्षण केल्याचे पुरावे आहेत पण ते समजून घेतो कोण ? हा प्रश्न आहे. करण आमच्या लोकांना आपण काय वाचत आहोत हेच समजत नाही, बर ते समजलं तर ते इतरांना सांगण्याच धाडस होत नाही म्हणून तर सारा सत्यानाश झाला आहे असं म्हटलं तर काय चुकीचे आहे. हिंदुत्वाच्या नावाने आकांडतांडव घालणारी भक्तांची मम्मी ? कंगणा रणावत ही गोमांस भक्षण करत होती हे तीने केलेल्या एका ट्वीट वरून सहज लक्षात येत. तेव्हा प्रश्न पडतो की, अखलाक नावाचा तरुण गोमांस घेऊन जातोय हे संशय आल्यावरून त्याची हत्या करणारे कंगणा रणावतच्या गोमांस भक्षण प्रकरणावर काहीच का बोलताना दिसत नाहीत ? कारण यांच्या पृष्ठभागाखाली जे धर्मग्रंथ आहेत त्यात नेमकं काय लिहिलं आहे हे डाॅ. सुरेंद्र शर्मा त्यांच्या ‘प्राचीन भारत में गोहत्या एवं गोमांसाहार’  या लेखात काही पुरावे देऊन म्हणतात की, ‘भारत में एक समय ऐसा रहा हैं जब बिना गोमांस खाए कोई ब्राम्हण ब्राम्हण नहीं रह सकता था ….प्राचीन कर्मकांड के मुताबिक वह अच्छा हिंदू नहीं जो गोमांस नहीं खाता. (प्रा. एम. एम. लिहीतकर लिखित गोरक्ताने माखलेली पुराणातील पाने आणि पापकर्माचे लायसन्स – गंगाजल योजना).
अभिनेत्री कंगना रणावतचे एक जुने ट्वीट व्हायरल होत आहे. ज्यात तिला गोमांस खायला आवडत असल्याचे ती म्हणाली आहे. घरातून बाहेर पडल्यावर तिचे आयुष्य खूप बदलले असे म्हणत या ट्वीटमध्ये आपण ड्रग्ज, दारू, गोमांस या सर्वाचे सेवन केल्याची कबुली दिली तीने आहे. ज्या दिवशी मी घर सोडत होते, तेव्हा आईने फक्त एक वचन देण्यास सांगितले होते. ती म्हणाली, आपण हिंदू आहोत कृपया गोमांस खाऊ नको. तेव्हापासून मला गोमांस खाण्याची घाई होती. गोमांस आणि इतर मांस खाण्यात काहीच गैर नाही. त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही, ८ वर्षांपूर्वी मी शाकाहारी झाले, असे त्या ट्विटमध्ये तीने लिहिले. (लोकसत्ता १२ सप्टें. २०२२ ) गोमांसाचे समर्थन कंगणा ऐवजी एखाद्या मुस्लिम व्यक्तीने केले असते तर या देशात काय झालं असतं ? लगेच धर्माचे ठेकेदार, भडव्यांनी हल्लाबोल करत  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले असते. नाहीतर त्या समर्थन करणा-या व्यक्तीचं शीर धडावेगळ याच भडव्यांनी केलं नसतं कशावरून ? पण कंगणा बोलली म्हणजे भक्तांची आई बोलली त्यामुळे ते चिडीचूप आहेत ? जे भडवे हिंदुत्वाच्या पोकळ गप्पा मारतात त्यांच्या व ते जे धर्मग्रंथांना मानतात त्यातच गोमांस भक्षण कसे करावे यांचे उतारे दिले आहेत. ‘शतपक्ष ब्राम्हण’ पुरणात गोमेध यज्ञाचे वर्णन आहे. गाईला बांधून यज्ञात तिची कशी बळी द्यावी याचे वर्णन आहे. तसेच ‘गोपथ ब्राम्हण’ नुसार बळी दिलेला प्राण्याचा कोणता भाग कोणी घ्यावा हे सांगितले आहे. जिभ, मान, खांदा, नितंब आणि मांड्यांवर पुरोहिताचा अधिकार होता. पाठीचा भाग यजमानासाठी.’ मग प्रश्न पडतो की, गोहत्येला विरोध करण्यासाठी मरायला आणि मारायला तयार असणारे खा. साक्षी महाराज कुठल्या मठात गांजा खेचीत बसले आहेत ? कारण ते यापुर्वीच म्हणाले होते की,  ‘खाटीकापासून गोमातेला वाचविण्यासाठी मी कोणालाही मारायला व मरायला तयार आहे, कोणी आमच्या आईला मारण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही.’ मग हे साक्षी नावाची भगवे वस्त्र घालून फिरणारी बया कंगना प्रकरणावर का शांत आहे? गोमातेच्या रक्षणासाठी मरायला तयार असणारे साक्षी महाराज आता काय प्रदीप जोशींच्या ओठी तोंड घालून गुलकंद चाखत बसले आहेत का?
प्रसिध्द लेखक डाॅ. सुरेंद्र शर्मा म्हणतात प्राचीन संस्कृत साहित्यात अनेक दाखले आहेत ज्यावरून हे स्पष्ट होत की, ‘गाय केवळ यज्ञातच बळी देण्यास कापल्या जात नव्हती तर विशिष्ठ अतिथी, वेदज्ञ विद्वान यांच्या स्वागत प्रसंगी गोमांस उपलब्ध केल्या जात असे.’ आज हेच धर्माचे ठेकेदार गोमाता गोमाता म्हणून आरोळी ठोकताना दिसतात तेव्हा नवल वाटते. कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ग्रंथ ‘द अनटचेबल्स’ मध्ये लिहतात की, गोमांसहारी ब्राम्हण गोपूजक बनले हा त्यांच्या युद्धनितीचा एक भाग होता. यज्ञात गोवधाचा विरोध बौद्धांनी केला. त्यामुळे जनतेत त्यांना आदर प्राप्त झाला.  बौध्दानंतर ब्राम्हण शाकाहारी बनले.’ आज शाकाहारी असल्याचा बनाव करणारे ब्राम्हण आणि त्यांचे काही चेले मात्र खुशाल गोमांस निर्यात करतात. म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सच्चर म्हणाले की, देशातील ९५ टक्के गोमांस व्यापारी हिंदू आहेत तरी देखील दादरी सारख्या घटना घडतात, येथे आमदार खासदारांच्या गोमांस कंपन्या आहेत, सामान्य माणसांना का लक्ष केले जाते ? (देशोन्नती २३ नोव्हें. २०१५).
वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा असं म्हणणा-या तुकोबांची हत्या करणारे ब्राम्हण वेदात असं लिहिलं आहे तसं लिहिलं आहे, त्याला प्रमाण मानतात. त्याच वेदात लिहल आहे की, गायीचे दूध व मांस अधिक स्वादिष्ट असते म्हणून अतिथिला वाढण्यापुर्वी गृहस्थानी खावू नये. (अर्थर्ववेद ९/३/३९) म्हणून तर प्रा. एम. एम. लिहीतकर म्हणतात की, गोवंश हत्या कायद्याने अपराध असेल तर गोवंशाचे मांस खाण्याचा आदेश देणारे धर्मशास्त्र आम्ही गाडले पाहिजे.’ पण भाजप या पक्ष व त्यांच्या समर्थकांनी धर्माच्या ठेका घेऊन पैशाचा मुक्का घेतला. त्या पक्षाची खरी कर्तबगारी वाचून तर नवल वाटत कारण ‘अलाना सन्य या जागतीक स्थरावरील सर्वात मोठ्या मांस निर्यात कंपनीने भाजपला अडीच कोटींची देणगी दिल्याची माहीती भाजपने निवडणूक आयोगाने सादर केलेल्या माहीतीत आहे.’ (दै. देशोन्नती १७ डिसें. २०१५) ह्या संघी विकृती बोलतात एक आणि यांचे वर्तन वेगळेच असते. हे आमच्या बहुजन समाजाने समजून घेतलं पाहिजे. यांनी कधीच गायीचा सांभाळ केला नाही परंतू त्या गायीचे मांस निर्यात करणा-या कंपनीकडून हप्ते वसूली केली असे म्हणता येईल ?
देशांत गोमांस निर्यात करणा-या सर्व कंपन्या विदेशी ब्राम्हणांच्या आहेत ? पण त्यांनी जे त्या कंपनीचे नाव दिले आहे ते वाचून आमचा बहुजन तरुण थेट आरोप करतो तो मुस्लिम समाजावर म्हणून तर दंगल मुक्त महाराष्ट्रचे शेख सुभान अली म्हणतात https://youtu.be/YQDrJ-iYNjU की, ‘योगीजी संपुर्ण देशातील शहरांची नावे बदलत आहात तर मग ‘अल कबीर बीफ एक्सपोर्ट’ या कंपनीचे नाव बदलून ‘दिनदयाळ उपाध्याय प्रोटीन एक्सपोर्ट’ असं ठेवा कारण या कंपनीचा मालक कोणी मुस्लिम नसून अतुल सबरवाल हा ब्राह्मण आहे. तसेच दुसरी कंपनी ‘अल अरबीया बीफ एक्सपोर्ट’ याही कंपनीचे नाव बदलावे कारण या कंपनीचा मालक कोणी मुस्लिम नसून सुनिल कपूर हे आहेत. त्यामुळे मुस्लिमाचे नाव देऊन मांस तर विक्री करू नका.’ त्यामुळे शेवटी बहुजन तरुणांना एकच सांगणे आहे की, गोमांस विक्री आणि ते भक्षण करणारे व गोहत्येला विरोध करणारे सर्व संघ मानसिकतेचे आहेत. यांचा हा दुटप्पीपणा समजून घ्या. हिंदुत्वाच्या नावाने बेगडी शंख करणारी अभिनेत्री कंगना राणावत गोमांस खात असेल तर हिंदुत्वादी भडवे आता कुठे प्रदीप जोशीच्या तोंडाचे मुक्के घेण्यात व्यस्त आहेत का ? त्यामुळे बहुजन समाजाने आधी प्रा. एम. एम. लिहीतकर म्हणतात त्याप्रमाणे गोवंशाचे मांस खाण्याचा आदेश देणारे धर्मशास्त्र आम्ही गाडले पाहिजे. कारण गाय ही केवळ शेतकरी समाजासाठी प्रिय आहे बाकी भडवे तिचे राजकारण करून मांस तर कधी मासांचा मलीदा चाखण्यात व्यस्त आहेत.

नवनाथ रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. भट बोकड मोठा

२. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला!

३. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

४. संत बन गये भोगी! (१२ जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे प्रकाशित होणार आहे)

संपर्क : रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

मो. ९७६२६३६६६२

Leave A Reply

Your email address will not be published.