लसीच्या माध्यमातून शरिरामध्ये जे घेतले ते आपलं दुर्भाग्य आहे – अभिनेता श्रेयश तळपदे यांचे खळबळजनक वक्तव्य

0 1,590

लसीच्या माध्यमातून शरिरामध्ये जे घेतले ते आपलं दुर्भाग्य आहे

– अभिनेता श्रेयश तळपदे यांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता श्रेयश तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयविकाराचा झटका येणं यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र लसीमुळे हृदयविकाराचा झटका येणं नाकारता येत नसल्याचे सांगत त्याने  आपल्याला काय माहिती नाही आपण लसीच्या माध्यमातून शरिरामध्ये काय घेतलं आहे. हे आपलं दुर्भाग्य आहे, असे म्हटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. श्रेयश तळपदे हे एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले.

कसोटीपटू शेन वाॅर्नचा कोविड लसीमुळे मृत्यू ह्दयरोगतज्ज्ञ डाॅ. असीम मल्होत्रा

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

कोरोनात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या औषधामुळे १७ हजार जणांचा मृत्यू – मलेरियाचे औषध कोरोना बाधितांना दिल्याने मृत्यू झाल्याचे संशोधनातून समोर

अभिनेता श्रेयशला एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्याने यामागचं कारण एका मुलाखतीत बोलत असताना सांगितलं. यावेळी तो म्हणाला की, “मी नियमित दारू पित नाही. मी कधीतरी दारू पितो. मी तंबाखू खात नाही. सिगारेट ओढत नाही. मधल्या काळात माझं कॉलेस्ट्रॉल वाढलं होतं. आता ते कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात आहे. यासाठी मी औषध घेत आहे. मला दुसरा कोणताही त्रास नाही मला डायबीटिज नाही. बीपीचा त्रास नाही..तर हृदयविकाराचा झटका येण्याचं कारण काय असू शकतं? इतकी सावधगिरी बाळगून आणि स्वत:ची काळजी घेऊन असं होत असेल तर याचं आणखी काय कारण असेल?” असं श्रेयश म्हणाला आहे.

कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारचा नकार – केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारने झटकले हात

कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांना तात्काळ भरपाई द्या – न्यायालयाने केंद्रसरकारला निर्देश द्यावेत याचिकेद्वारे मागणी

त्यानंतर श्रेयशने कोविड १९ लसीबाबत वक्तव्य केलं तो म्हणाला की, “काही सिद्धांत असे आहेत की मी ते नाकारू शकत नाही. मला थकवा जाणवू लागला होता. हे तथ्य आपल्याला नाकारता येत नाहीत. आपल्याला काय माहिती नाही आपण लसीच्या माध्यमातून शरिरामध्ये काय घेतलं आहे. हे आपलं दुर्भाग्य आहे.

“लसीमुळे  आपल्याला काही झालं आहे ते ऐकलं नव्हतं. लसींमुळे काय प्रभाव झाले आहेत हे जाणून घ्यायचं आहे. आपल्याकडे पुरावा असेल तर आपण त्यावर बोलू शकतो. आपल्याकडे पुरावा नसेल तर आपल्याला काहीही बोलता येत नाही. तरीही त्या लसीचा आपल्या शरीरावर काय परिणाम होईल हे जाणून घेणं गरजेचं आहे, असे म्हणाला. श्रेयस याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करत एंजियोप्लास्टी करण्यात आली. आता अभिनेता पूर्वी प्रमाणे शुटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. तो लवकरच ‘गोलमाल 3’ चित्रपटातून प्रेक्षकांना भेटीसाठी येणार आहे.

फायझरच्या कोरोना लसीमध्ये कर्करोग निर्माण करणारा डीएनए – डीएनएमध्ये कर्करोग होण्याची क्षमता असल्याची शास्त्रज्ञांमध्येही चर्चा

कोरोनाची लस घेऊन मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण

Leave A Reply

Your email address will not be published.