कोरोनात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या औषधामुळे १७ हजार जणांचा मृत्यू – मलेरियाचे औषध कोरोना बाधितांना दिल्याने मृत्यू झाल्याचे संशोधनातून समोर

0 477
कोरोनात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या औषधामुळे १७ हजार जणांचा मृत्यू
– मलेरियाचे औषध कोरोना बाधितांना दिल्याने मृत्यू झाल्याचे संशोधनातून समोर
वॉशिंग्टन : कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता या औषधामुळे १७ हजार मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला असल्याचे  हायड्रोक्सीक्लोरोक्वीन संदर्भात एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियाचे औषध आहे असून त्याचा कोरोना काळात दिल्याने लोकांचा मृत्यू झाल्याचे एका संशोधनातूर समोर आले आहे.
फ्रेंच संशोधकांनी केलेल्या अभ्यासाच्या अहवालानुसार असे आढळून आले आहे की, कोविड १९ च्या पहिल्या लाटेत मार्च ते जुलै २०२० या काळात सहा देशांमध्ये सुमारे १७ हजार लोकांचा मृत्यू या आजारामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिल्यानंतर झाला असावा, असे या संशोधकांनी म्हटले आहे. कोरोना महामारीच्या काळात, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन लोकांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध घेण्याचे आवाहन केले होते, जे सहसा संधिवात आणि ल्युपसवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. आपण स्वत: चमत्काराचे औषध घेत असल्याचा दावाही त्यांनी केला.
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियाचे औषध आहे जे कोविड १९ च्या उपचारातही मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. बायोमेडिसिन अँड फार्माकोथेरपीच्या फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की मृत्यूच्या संख्येत वाढ हे हृदयविकार आणि स्नायू कमकुवत होण्यासारख्या दुष्परिणामांमुळे होते
याविषयी संशोधकांनी सांगितले की, मृत्यूची संख्या जास्त असू शकते, कारण त्यांच्या अभ्यासात मार्च ते जुलै २०२० दरम्यान फक्त सहा देशांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांनी विविध अभ्यासांचे विश्लेषण केले ज्यात हॉस्पिटलायझेशन आणि ड्रग एक्सपोजर आणि कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे संबंधित जोखीम पाहिली.
आपत्कालीन वापराची अधिकृतता रद्द
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर, शास्त्रज्ञांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध संसर्गावर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असे सुचविले होते. याला २८ मार्च २०२० रोजी अन्न आणि औषध प्रशासनने आणीबाणीच्या वापरास मान्यता दिली. मात्र न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसीन मधील एका अभ्यासासह, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा कोरोनाव्हायरस विरूद्ध कोणताही फायदा होत नाही, त्यामुळे मृत्यूचा धोका वाढला आहे, असे आढळल्यानंतर एफडीएने जून २०२० मध्ये आपत्कालीन वापराची अधिकृतता रद्द केली.
Leave A Reply

Your email address will not be published.