थंड हवामान हृदयविकारासाठी सर्वात धोकादायक – हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देबब्रत रॉय यांचा इशारा

0 35
थंड हवामान हृदयविकारासाठी सर्वात धोकादायक 
– हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देबब्रत रॉय यांचा इशारा
नवी दिल्ली : हिवाळ्याच्या सुट्या आणि डिसेंबर-जानेवारीमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असल्याने या काळात लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा इशारा अमेरिकन हार्ट असोसिएशनने दिला आहे. एसएसएम डॉक्टरांनी सांगितले की, ख्रिसमस आणि जानेवारीच्या सुट्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने अधिक लोकांचा मृत्यू होतो. यावर सीएसआयचे माजी सरचिटणीस आणि कोलकाता येथील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देबब्रत रॉय म्हणाले की, थंड हवामान हृदयविकारासाठी सर्वात धोकादायक आहे.
गुरूग्राम सनार इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. डी. के. झांब म्हणाले की, हिवाळ्यात नवीन हृदयरुग्णांची संख्या वाढते. यामध्ये ५५-६० वयोगटातील लोकांची संख्या नक्कीच जास्त आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरच्या तुलनेत गेल्या महिन्यात दिल्ली-एनसीआरमधील हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावविषयी कार्डिओलॉजी सोसायटी आॅफ इंडियाचे (सीएसआय) माजी सरचिटणीस आणि कोलकाता येथील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देबब्रत रॉय म्हणाले की, थंड हवामान हृदयविकारासाठी सर्वात धोकादायक आहे.
नोएडा येथील  कैलाश हॉस्पिटल मधील वरिष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ. पार्थ चौधरी म्हणतात की, थंडीच्या काळात हृदयाचा धोका वाढतो. या काळात थंडीमुळे बीपी वाढणे आणि प्रदूषण ही दोन प्रमुख कारणे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून, दिल्ली एनसीआरमध्ये डिसेंबर-जानेवारी या काळात नवीन हृदयरुग्णांची संख्या अचानक वाढल्याचे दिसून आले आहे. वाढत्या थंडीमुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आमच्या रुग्णालयात हृदयविकाराच्या नवीन रुग्णांची संख्या ५० टक्कयांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये वृद्ध किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोकच नाहीत तर तरुण वयोगटातीलही अनेक रुग्ण आहेत, असे म्हणाले.
आउटिंग दरम्यान अनियमित शारीरिक हालचाली (जसे की अत्यंत थंड भागात चालणे, पर्वतावर चढणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त शारीरिक काम करणे) आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे याचा धोका वाढतो. तसेच या संशोधनातून असे समोर आले आहे की, आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात हृदयविकाराच्या झटक्याची नोंद होत आहे.
थंडीच्या काळात हृदयविकाराचा धोका
थंडीच्या काळात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक असतो. या काळात भारतात हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. थंडी, हवामानातील बदल, प्रदूषणाची वाढती पातळी आणि अनियमित शारीरिक हालचाल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जातात, असे भारतीय हृदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हृदयविकाराचा धोका टाळा
थंडीच्या काळात बीपी आणि हृदयाच्या रुग्णांसह सर्वांनी थंड भागात बाहेर जाण्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे टाळण्यासाठी आवश्यक तपासण्या करून आणि हृदयविकाराचा संशय आल्यास खबरदारी घेतल्यास हृदयविकाराचा झटका टाळता येतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.