भ्रष्ट अधिकारी व प्रशासनाच्या आशीर्वादाने गोदापात्रातील वाळूचा सर्रास अवैधरीत्या उपसा सुरू

0 36

भ्रष्ट अधिकारी व प्रशासनाच्या आशीर्वादाने गोदापात्रातील वाळूचा सर्रास अवैधरीत्या उपसा सुरू

– अवैध्य वाळू उपसा तात्काळ थांबवा अन्यथा जनआंदोलन उभा करणार : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज

 

परळी (वार्ताहर) : परळी तालुक्यातील गोदाकाटच्या दिग्रस, पोहनेर, तेलसमुख व बोरखेड या गावाच्या लगत गोदापात्रातील वाळू उपसा भ्रष्ट अधिकारी व प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सुरू झाला असून यासाठी जेसीबी मोठे मोठे हायवा टिप्पर यांच्या माध्यमातून हा वाळू उपसा सुरू आहे. हा चालू असलेला अवैध्य वाळू उपसा तात्काळ थांबवा अन्यथा जन आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे.

शासनाने काढलेल्या नवीन जीआर नुसार मुबलक दरामध्ये वाळू उपलब्ध करून देऊ असा ठराव सरकारने मागच्या काही दिवसापूर्वी घेतला आहे. पण याला पायदळी तुडवत परळी तालुक्यातील गोदापात्रात वाळू उपसा सर्रासपणे अवैधरीत्या चालू झाला असून 50000 , 60000 हजार रुपयाला एक हयवा विकला जात आहे.या माध्यमातून काही राजकीय लोकांचा फायदा होत असून शासनाचे व सर्वसामान्य लोकांचे यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे त्यामुळे हा अवैध वाळू उपसा तात्काळ थांबवा.
परळी तालुक्यात मागच्या अनेक वर्षापासून वाळू माफिया व भ्रष्ट अधिकारी यांची मिलीभगत असल्यामुळे शासनाचे व जनतेचे नुकसान करून सर्रास मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या वाळू उपसा चालू आहे. मागच्या काही दिवसापासून गोदापात्रातील वाळू उपसा सर्रासपणे अवैधरित्या सुरू केला असून हा अवैधरित्या वाळू उपसा तात्काळ थांबवा अन्यथा याच्या विरोधात जन आंदोलन उभा करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.