कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

0 1,133

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप

– कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

 

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण होऊन त्याला आता जवळपास तीन वर्षे होऊन गेली. कोरोनापासून बचाव व्हाया यासाठी कवचकुंडल असे गोंडस नाव देऊन सरकारी यंत्रणेने गैरवापर करून सर्वांनाच कोरोना लस देण्यासाठी बळजबरी केली. यावेळी सोशल हेल्थ मुव्हमेंट व अव्हेकन इंडिया या सामाजिक संघटना कोरोना षढयंत्र व लसीचे दुष्परिणाम सांगताना दिसत होत्या मात्र त्याकडे नागरिकांना सर्रासपणे दुर्लक्ष करून लस घेतली त्या सर्वांसाठी धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप करण्यात आला यावर कोविशिल्ड लस उत्पादन करणा-या अॅस्ट्राझेनकानं लंडनच्या कोर्टात कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत कबुली दिली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे लाट पसरल्याची माहिती समोर येत आहे.

पुन्हा मारमारी येणार? – चीनकडून आयसीयू बेडची संख्या वाढवण्यावर भर

कोरोनात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या औषधामुळे १७ हजार जणांचा मृत्यू – मलेरियाचे औषध आहे  कोरोना बाधितांना दिल्याने मृत्यू झाल्याचे संशोधनातून समोर

कोविशिल्ड लस तयार करणारी कंपनी अॅस्ट्राझेनकानं कोर्टात जी कागदपत्रं सादर केली आहेत. त्यात कंपनीनं पहिल्यांदाच कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत कबुली दिली आहे. कोविड-१९ लशीमुळे रक्त गोठण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात, असे कंपनीने सांगितले आहे. पण या दुष्परिणामांच्या प्रकरणांची संख्या खूपच कमी असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

कोरोनाच्या संक्रमणामुळे हृदय मरू शकते – जपानच्या आरआयकेईएन संस्थेच्या शास्त्रज्ञांचा दावा

कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांना तात्काळ भरपाई द्या – न्यायालयाने केंद्रसरकारला निर्देश द्यावेत याचिकेद्वारे मागणी

लस उत्पादन करणाऱ्या कंपनीविरोधात खटला
अनेक कुटुंबांनी कोरोना लशीमुळे नुकसान झाल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता, त्यापैकीच एक म्हणजे जेमी स्कॉट नावाची व्यक्ती. ज्याने ॲस्ट्राझेनेकाविरुद्ध खटला दाखल केला होता. एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी कोरोना लशीचा डोस घेतला, त्यानंतर त्याला कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाले. जेमी स्कॉटसह इतर अनेक रुग्णांना TTS सोबत थ्रोम्बोसिस नावाचं दुर्मिळ लक्षण होतं. त्यांनी या लस उत्पादक कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केल्याची माहिती डेली मेलच्या प्रसिद्ध केली आहे.

फायझरच्या कोरोना लसीमध्ये कर्करोग निर्माण करणारा डीएनए – डीएनएमध्ये कर्करोग होण्याची क्षमता असल्याची शास्त्रज्ञांमध्येही चर्चा

सीरम इन्स्टिट्यूटचा अॅस्ट्राझेनकाशी करार
कोरोना काळात यूकेतील फार्मास्युटिकल कंपनी अॅस्ट्राझेनकाने ऑक्सफोर्डच्या मदतीने कोविड लस तयार केली होती. भारतात लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने अॅस्ट्राझेनकाशी करार करून ही लस भारतातच तयार केली होती. यानंतर देशातील निम्म्याहून अधिक लोकांना कोविशील्ड लस दिली गेली.

कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांचे मत – स्त्री आणि पुरुषांमध्ये हार्ट ॲटॅकची लक्षणे असतात भिन्न

लसीच्या दुष्परिणामांची कंपनीकडून कबुली
कोरोना लस उत्पादन करणाऱ्या कंपनीने न्यायालयात कबूल केले की, या लशीमुळे आरोग्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये यूकेच्या न्यायालयात कंपनीनं कायदेशीर दस्तऐवज सादर केले. त्यात कंपनीनं म्हटलं की, अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये टीटीएस होऊ शकतं. या स्थितीत प्लेटलेट कमी होणं आणि रक्त गोठणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारचा नकार

कोरोना लसीच्या दुष्परिणामामुळे दोघांचा मृत्यू ?

केंद्र सरकारने झटकले हात
यापूर्वी भारत देशात देखील लस उत्पादन करणाऱ्या कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारून त्यावर स्पष्टीकरण मागितले असतात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटले की, लस घेऊन त्यांच्या दुष्परिणामामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्याची जिम्मेदारी सरकारची नसेल, असे म्हणत केंद्र सरकारने हात झटकले आहेत.

जहाँ डर हैं, वही कोरोना क्यो हैं ?

एकही मृत्यू कोरोनामुळे नाही… आणखी एक मास्टरस्ट्रोक !

कोरोनाची लस घेऊन मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण

कोरोना लस नव्हे तर विष आहे !

 

Leave A Reply

Your email address will not be published.