भाजप नेत्यांनी मराठा आरक्षणाला खोडा घातला – पंतप्रधान मोदींवर इतकी वाईट वेळ, स्वत:चे चिन्ह सोडून दुसºयाच्या चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ मनोज जरांगेंचा भाजपला टोला

0 194

भाजप नेत्यांनी मराठा आरक्षणाला खोडा घातला
– पंतप्रधान मोदींवर इतकी वाईट वेळ, स्वत:चे चिन्ह सोडून दुसºयाच्या चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ मनोज जरांगेंचा भाजपला टोला

धाराशिव : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी मराठा आरक्षणाला खोडा घातला. मराठ्यांना आरक्षण मिळू दिले नाही. यामुळे राज्यातील मराठाच्या भावना तीव्र आहेत. हे ओळखून महाराष्ट्रात निवडणुकीचे पाच टप्पे पाडण्यात आले. राज्यातील स्थानिक भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की, स्वत:चे चिन्ह सोडून दुसºया पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी सभा घ्यावा लागत आहेत, अशी टिका मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथे केली. त्यांच्या हस्ते सोमवारी दि. २९ एप्रिल रोजी शहरातील भवानी चौक येथे नारायणगड महासभेच्या प्रचाररथाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

उज्ज्वल निकम यांना लोकसभेत न पाठविता जेलमध्ये पाठवावे लागेल – माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांचा घणाघात

संविधानावर दरोडा घालू पहाण-या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग अभिनेते किरण मानेंचा उज्वल निकम यांच्यावर घणाघात
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण न दिल्याने भाजपावर वाईट वेळ आली आहे. ज्या राज्यात लोकसभेच्या ८८ जागा आहेत, तीथे मतदानाचा एक टप्पा आहे. मात्र महाराष्ट्रात ४८ जागा असताना मतदानाचे ५ टप्पे करण्यात आले आहेत. ही वेळ महाराष्ट्रातील स्थानिक भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर आणली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते मराठा समाजाचा द्वेष करतात. त्यांना महाराष्ट्र सोडता येत नाही. इथेच खरे मराठे जिंकले आहेत. मराठ्यांच्या एकजुठीला घाबरून भाजपवर ही वेळ आली आहे. मोदी यांना मोठ्या संख्येने महाराष्ट्रात सभा घ्याव्या लागत आहेत. यापुर्वी इतका वेळी त्यांनी कधी महाराष्ट्रासाठी दिला नव्हता. सगेसोयरे व मराठा कुणबी एक असल्याचा आदेश पारित नाही केल्यास यापेक्षा वाईट वेळ भाजप नेत्यांवर येऊ शकते. मराठा समाजाने भाजपाला सत्ता दिली पण त्यांनी आरक्षण दिले नाही. मराठा समाजाने विधानसभेची तयारी एक महिन्यापुर्वी सुरू केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास मराठा समाज ताकदीने विधानसभा लढवणार असल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी जाहीर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.