संविधानावर दरोडा घालू पहाणा-या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग अभिनेते किरण मानेंचा उज्वल निकम यांच्यावर घणाघात

0 1,734

संविधानावर दरोडा घालू पहाणा-या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग
अभिनेते किरण मानेंचा उज्वल निकम यांच्यावर घणाघात

बीड : सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून महाआघाडीच्या सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा झाली मात्र महायुतीच्या जागावाटपावर अजूनपर्यंत निर्णय न झाल्याने इच्छुकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यात मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या हातील पक्षाने नारळ देत त्याचा पत्ता कापून भाजपाने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांच्या उमेदवारीनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर संविधानावर दरोडा घालू पहाणा-या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग, अशी घणाघाती टीका उज्वल निकम यांच्यावर केली आहे.

लघू किंवा सूक्ष्म, तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात तुम्ही आणलात का? – शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंचा नारायण राणेंना खडा सवाल
अभिनेते किरण माने हे फेसबुकवर नेहमी सक्रिय असतात. ते विविध विषयावर व्यक्त होतात. त्यांनी मांडलेली प्रतिक्रीया हे रोखठोक असल्याने कोणाला ती वादाची तर कोणाला चांगली वाटते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपल्या शब्दांना प्रबोधनकार ठाकरे यांच्या शब्दांची जोड आणि धार दिल्याने त्यांच्या प्रतिक्रीया चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. त्यातच भाजपकडून उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून सडकून टीका केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अभिनेते किरण माने यांनी लिहिले की, महाराष्ट्रातल्या दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा न्यूज चॅनल्स याच विद्वान वकिलाकडून एक्सपर्ट ओपिनियन घेत होते. हा भामटा पटवून देत होता की हे दरोडे कसे कायदेशीर आहेत. आत्ता समोर आला हा संविधानावर दरोडा घालू पहाणार्‍या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग.

शाईफेक करून मराठा समाजावर नाव घालणे हा प्रकाश शेंडगेंचा स्टंट – प्रकाश शेंडगे यांनी केलेले आरोप मराठा समाजाने नाकारले
माने यांनी हीच पोस्ट फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही माध्यमावर टाकून निकम यांच्या दुटप्पीपणाचा बुरखा फाडण्याचे काम केल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. किरण माने यांच्या या प्रतिक्रीयेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. या गोष्टीवर बोलण्यासाठी कोणीही तयार नसताना किरण माने यांनी दाखवलेले धाडस हे तरूणांना आकर्षित करणारे आहे.
निकम्मा माणूस महाराष्ट्रात विद्वान कायदेतज्ज्ञ म्हणून मिरवत होता
निकम यांना माध्यामांनी तुम्ही वर्षा गायकवाड यांचे आव्हान कसे पेलणार, असा प्रश्न विचारला असता उत्तर देताना ते म्हणाले, माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे. यावर किरण माने यांनी सडकून टीका करताना म्हटले की, असला हास्यास्पद, बालीशबुद्धी, निकम्मा माणूस महाराष्ट्रात विद्वान कायदेतज्ज्ञ म्हणून आजवर मिरवत होता.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या रिंगणात मद्य विक्रेत्यांचा सुळसुळाट – संदीपान भुमरेंच्या पत्नीच्या नावे मद्यविक्रीचे परवाने, शपथपत्रात मद्य परवान्यांची नोंद

 

Leave A Reply

Your email address will not be published.