लघू किंवा सूक्ष्म, तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात तुम्ही आणलात का? – शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंचा नारायण राणेंना खडा सवाल

0 77

लघू किंवा सूक्ष्म, तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात तुम्ही आणलात का?
– शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंचा नारायण राणेंना खडा सवाल

रत्नागिरी : काल कोणत्या पक्षात, आज कोणत्या पक्षात आहे, हे आठवत नाही. इतके वर्ष स्वत: सकट स्वत:ची पिलावळ, जिकडे सत्ता तिकडे तुम्ही झुकता, सगळी मंत्रीपदे घेतली आमदारकी, खासदारकी सगळी घेतली, पण माझ्या कोकणासाठी काय केलं. एकतरी लघू किंवा सूक्ष्म, तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात तुम्ही आणलात का? असा प्रश्न उपस्थित करीत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंसह नितेश आणि निलेश राणे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या रिंगणात मद्य विक्रेत्यांचा सुळसुळाट – संदीपान भुमरेंच्या पत्नीच्या नावे मद्यविक्रीचे परवाने, शपथपत्रात मद्य परवान्यांची नोंद
रत्नागिरीमध्ये रविवारी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की, सर्व मंत्रीपदे घेतली आमदारकी, खासदारकी सगळी घेतली, पण माझ्या कोकणासाठी काय केलं, असे म्हणत राणेवर तोफ डागली. याशिवाय ते म्हणाले की, विनाशच होणार असेल म्हणूनच देवाचे आशिर्वाद आहे, त्याने शिवसेनेला भाजपापासून दूर केलं. त्यांचा विनाश होणार आहे, त्यांच्यासोबत नका राहू, हेच देवाच्या आशिवार्दाने झालंय, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप हुशार आहे, त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे मंत्रीपद दिलंय, लघू आणि सूक्ष्म. आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावा लागेल, म्हणजे अतिसूक्ष्म कोरोनाचा जीवाणू दिसेल, पण हे नाही दिसणार एवढे सूक्ष्म होतील हे, पण मस्ती किती. आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघालात? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

नांदेडमधील भाऊसाहेब एडके या तरूणाने घातले इव्हीएम मशिनवर कु-हाडीने घाव – इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन तोडणारा तरूण चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

नाशिकवाल्यांनी अस्वस्थ व्हायची गरज नाही – हा त्यांचा बालिशपणा म्हणत छगन भुजबळांचे नाव ने घेता पंकजा मुंडेचा टोला

बीडमधील भाजप नेत्यांकडून नाशिकमधील इच्छुक उमेदवारांच्या फाटक्यात पाय! – पंकजा मुंडेंनी केलेल्या नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचा विरोध
शिवसैनिक ही माझी वडीलोपार्जित कमाई
शिवसैनिक ही माझी वडीलोपार्जित कमाई आहे, याचा मला अभिमान आहे, हे माझं वैभव आहे. मोदी म्हणतात आमची घराणेशाही आहे, हो आहे आमची घराणेशाही आहे आणि ती लोकांना मंजूर आहे. तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही, बाळासाहेबांचा फोटो लावता, नालायक माणसं अंगामध्ये कर्तृत्व नाही, शिवसेना चोरताय, धनुष्यबाण चोरतात, माझे वडील चोरताय, कर्तृत्व शून्य माणसं आहेत, असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहटीला गेलेल्या आमदारांना टोला लगावला.
तुम्ही कुणाची घराणेशाही पोसता?
तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नकोय, हिंदुह्रदयसम्राटांची घराणेशाही नकोय, तुम्हाला गद्दारांची-गुंडांची घराणेशाही चालते, हे दु:ख तुम्हाला नसलं, आम्हाला नसलं तरी अटलजींना वाटत असेल. तुम्ही कुणाची घराणेशाही पोसताय, असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

शाईफेक करून मराठा समाजावर नाव घालणे हा प्रकाश शेंडगेंचा स्टंट – प्रकाश शेंडगे यांनी केलेले आरोप मराठा समाजाने नाकारले

मनसेच्या पाठिंब्यानंतर ओटो की बात नोटो तक – रसद पुरवा; बाळा नांदगावकरांची महायुतीकडे साद

 

Leave A Reply

Your email address will not be published.