बीडमधील भाजप नेत्यांकडून नाशिकमधील इच्छुक उमेदवारांच्या फाटक्यात पाय! – पंकजा मुंडेंनी केलेल्या नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचा विरोध

0 203

बीडमधील भाजप नेत्यांकडून नाशिकमधील इच्छुक उमेदवारांच्या फाटक्यात पाय!
– पंकजा मुंडेंनी केलेल्या नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांचा विरोध

बीड : बीड लोकसभा निवडणूक चुरशीची ठरत असून या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यात भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी बीड येथील सभेम बोलताना प्रीतम मुंडे यांच्यावर अन्याय होणार नाही, वेळ आली तर प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करु, अशी घोषणा केल्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघावरून राज्यात नव्या चर्चेला उधाण आले आहे. या मतदार संघातील जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने अनेकांच्या मनात धाकधुक आहे. त्यात छगन भुजबळ यांनी या निवडणूकीतून पळ काढून शिंदे गटातील हेमंत गोडसे यांचा मार्ग मोकळा केला. मात्र पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानानंतर नाशिक मधील उमेदवारांच्या फाटक्यात पाय घालण्याचे काम बीड मधील भाजपमधील नेत्यांनी केल्याचे बोलले जात आहे. भुजबळांच्या विरोधानंतर पंकजा मुंडेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
नाशिक लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटातील छगन भुजबळ हे तिकीटासाठी व्हेंटीलेटवर होते. मात्र नाशिक मधील मराठा समाजाचा वाढता विरोध पाहून त्यांनी रंणागणातून पळ काढल्याचे नाशिकमधील मराठा समाजामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच भाजपने खासदार प्रितम मुंडे यांना उमेदवारी नाकारून पंकजा मुंडेंना दिल्याने प्रितम मुंडे अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू असतानाच बीडच्या सभेत प्रीतम मुंडे यांच्यावर अन्याय होणार नाही, वेळ आली तर प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करु, विधान पंकजा मुंडेंनी केल्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले.

आपले आमदार विधानसभेत गेल्यास तिथले टेबल बाहेर आणतील – मराठा आरक्षणाला विरोध करणारांना पाडा, मनोज जरांगे यांचे आवाहन

मनोज जरांगे यांच्यावरील संघर्षयोध्दा सेन्सॉरच्या कात्रीत ‑ संघर्षयोध्दा चित्रपट आडवण्याचा प्रयत्न करीत असाल तर गाठ माझ्याशी आहे मनोज जरांगे यांचा इशारा

स्वतःलाच मोठा समजत होता, दिसत नाही हिमालयात बर्फात जाऊन झोपला का काय? – मनोज जरांगे पाटील यांचा मंत्री छगन भुजबळवर निशाणा
नाशिकमध्ये महायुतीकडून उमेदवाराची शोधाशोध सुरू असून त्यांना उमेदवार सापडतो की नाही याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक लोकसभेसाठी महायुतीला उमेदवार सापडत नाही, ही अडचण नसून खूप उमेदवार आहेत ही अडचण आहे. वंजारी उमेदवार देण्याची वेळ आली तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून तीन वंजारी उमेदवार इच्छुक असल्याचे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रितम मुंडेच्या उमेदवारीला विरोध करून पंकजा मुंडेंना इशारा देण्याचे काम केल्याचे
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात लक्ष घालावे. १३ तारखेला निवडणूक आहे. त्यांना निवडून यावं लागेल. यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. महायुतीकडून नाशिकमध्ये तीन वंजारी उमेदवारांमध्ये भाजपकडून हेमंत धात्रक, माजी आमदार बाळासाहेब सानप, शिंदे गटाचे उदय सांगळे या तीन उमेदवार इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी जो डाव टाकला होता तो भुजबळांनी उधळून लावल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे पंकजा मुंडे या आपली बहीण प्रितम मुंडेसाठी कोणती भूमिका घेणार याकडे बीड मधील भाजप नेते आणि कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे.
प्रितम मुंडेची नाशिमधील उमेदवारी गमतीचा विषय
प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं वक्तव्य गमतीने केलं होतं. नाशिकवाल्यांनी अस्वस्थ व्हायची गरज नाही. छगन भुजबळ यांनी दिलेला सल्ला वडिलकीच्या नात्याने स्वीकारते, असे बीड लोकसभेतून महायुतीच्या उमेदवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता प्रितम मुंडेच्या उमेदवारीचे नेमके काय होणार याकडे प्रितम मुंडेच्या समर्थकांचे लक्ष लागल्याचे बोलले जात आहे.

ओबीसी नेत्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी – मराठा आरक्षणाला विरोध करणाºया नेत्यांवर मनोज जरागेंचा घणाघात

महादेव जानकर समाजाचं नाव घेत स्वत:ची झोळी भरण्याचे काम करीत आहेत – यशवंत सेनेचे प्रमुख सुरेश बंडगर यांचा जानकरांवर जोरदार हल्ला

शृंगारेंच्या बुलेट ट्रेनने थेट बावनकुळेंचे सुळे काढले – भाजप उमेदवार सुधारक शृंगारे यांच्या भाषणाची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा

Leave A Reply

Your email address will not be published.