स्वतःलाच मोठा समजत होता, दिसत नाही हिमालयात बर्फात जाऊन झोपला का काय? – मनोज जरांगे पाटील यांचा मंत्री छगन भुजबळवर निशाणा

0 131

स्वतःलाच मोठा समजत होता, दिसत नाही हिमालयात बर्फात जाऊन झोपला का काय?
– मनोज जरांगे पाटील यांचा मंत्री छगन भुजबळवर निशाणा

पुणे : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ८ जून रोजी नारायणगड येथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. ही सभा विश्वविक्रमी करण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे विरोधकांना घेरण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांचा आक्रमकपणा पाहुन स्वतःला ओबीसींचा नेता समजणारे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून काढता पाय घेतल्याचे बोलले जात आहे. छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यावर भोरमध्ये, ‘लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?..दिसत नाही अजून.. बर्फात जाऊन झोपला का कायं हिमालयात.. असे म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

मी जात कधीही काढणार नाही – पंकजा मुंडे यांचा सुर नरमला

राजकीय पक्ष; अंधभक्त निर्मीतीचे कारखाने !

शृंगारेंच्या बुलेट ट्रेनने थेट बावनकुळेंचे सुळे काढले – भाजप उमेदवार सुधारक शृंगारे यांच्या भाषणाची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा
जिल्ह्यातील भोरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मनोज जरांगे यांच्या पायाजवळ अचानक सापसुरळी आली, त्याचाच आधार घेत ही सापसुरूळी येवल्यावरून आली का काय? असा टोला लगावल्याने उपस्थितांमध्ये हस्सकलोळ झाला. यावेळी ते म्हणाले, मी सगळे तुमच्या ताकदीवर नीट केलेले आहेत. पहिल्यांदा आपली जात एकत्र नव्हती. त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला. आपला छळ केला. पण आता समाज एक झालाय. लोकसभा निवडणुकीत कुणाला ना पाडा म्हटले, ना कुणाला निवडून आणा म्हटलेयं. तुम्हाला पाडायच आहे, त्यांना पाडा, पण पाडताना एवढ्या ताकदीने पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्यांना उभे राहता येणार नाही. एवढी ताकद यावेळी मराठ्यांनी यावेळी दाखवावी, हे मी मराठ्यांना सांगितले आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

मराठा निवडणूक मैदानात उतरणार
मराठा आणि कुणबी एकच असून सगेसोयऱ्याची अंबलबजावणी कायदा पारित करून आरक्षणाचा प्रश्न मिटवा. जो या बाजूने असेलं त्याला समाजानं मतदान करावे. जर आरक्षण नाही दिलं, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज १०० टक्के मैदानात उतरणारं आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

नारायणगडावर साफसफाईचे काम सुरू
नारायणगड येथे ८ जूनला होणाऱ्या सभेबाबत माहिती देताना मनोज जरांगे म्हणाले की, या ठिकाणी १७०० एकर जमीन आहे. त्यातील ९०० एकर जमिनीची साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. हे काम एक तारखेपासून अधिक वेगाने सुरू होणारं आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या जवळपास २ हजार हेक्टरवर पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी शेतकरी स्वतःचे बांधसुद्धा मोडणार आहेत. या सभेला राज्यातील ६ कोटी मराठा समाज एकत्र येणार आहे. त्यासाठी गावागावात जागृती सुरू केली आहे. ८ जूनला एकही मराठा घरी राहणार नाही.

ओबीसी नेत्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी – मराठा आरक्षणाला विरोध करणाºया नेत्यांवर मनोज जरागेंचा घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चक्रव्यूहात अडकवलंय – माजी मंत्री शिवसेना नेते सुरेश नवलेंकडून एकनाथ शिंदेना घरचा आहेर

Leave A Reply

Your email address will not be published.