शृंगारेंच्या बुलेट ट्रेनने थेट बावनकुळेंचे सुळे काढले – भाजप उमेदवार सुधारक शृंगारे यांच्या भाषणाची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा

0 84

शृंगारेंच्या बुलेट ट्रेनने थेट बावनकुळेंचे सुळे काढले
– भाजप उमेदवार सुधारक शृंगारे यांच्या भाषणाची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे आमदार, नेते, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी भर सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावात बदल करीत बावनसुळे असा उल्लेख करीत भाजपच्या आमदारांचा माजी आमदार म्हणत नामोल्लेख केल्याने व्यासपीठावर कुजबूज सुरू झाली. गेल्या महिनाभरापासून लातूर लोकसभा मतदारसंघात शृंगारे यांच्याबद्द नकारात्मक चर्चा सुरू असतानाच शृंगारेंची बुलेट ट्रेन थेट बावनकुळेंचे सुळे काढत आजीला माजी करीत निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ओबीसी नेत्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी – मराठा आरक्षणाला विरोध करणाºया नेत्यांवर मनोज जरागेंचा घणाघात
सुधाकर शृंगारे यांच्याबद्दल नकारात्मक चर्चा सुरू असतानाच त्यावर मात करीत शृंगारे यांना उमेदवारी मिळाली. यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या प्रचारसभेत सुधाकर शृंगारे यांची गाडी अशी काही सुसाट सुटली की, त्याला ब्रेकच लागत नव्हता. त्यांच्या विना ब्रेकच्या या गाडीने अनेकांना माजी आणि कुळेचे सुळे करून टाकले. आपल्या भाषणाला सुरुवात करण्याआधी व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचा नाम उल्लेख करताना शृंगारे यांची चांगलीच भांबेरी उडाल्याने त्यांच्या तोंडून निघालेल्या शब्दांमुळे भाजपच्या आमदारांमध्ये आपण उद्या माजी तर होणार नाही यांच्या भितीने घर केल्याचे व्यावपीठावर झालेल्या गोंधळात स्पष्ट जाणवत होते.

राज्यात मराठ्यांच्या भीतीने लोकसभेचं पाच टप्यात मतदान – मनोज जरांगे पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चक्रव्यूहात अडकवलंय – माजी मंत्री शिवसेना नेते सुरेश नवलेंकडून एकनाथ शिंदेना घरचा आहेर
शृंगारे यांनी आपल्या भाषणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख चक्क बावनसुळे असा केला, तर भाजपचे औशाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार, अहमदपूरचे बाबासाहेब पाटील, रमेश आप्पा कराड या सर्वांचा उल्लेख माजी आमदार म्हणून केला. बरं त्यांना व्यासपीठावरील नेते चुकीचा उल्लेख करत आहात हे सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र शृंगारेंची बुलेट ट्रेन थेट बावनकुळेंचे सुळे काढत माजी स्टेशन ओलांडत निघाली की त्याला ब्रेक लावणे व्यासपीठावरील कोणालही जमले नाही.
उमेदवार शृंगारे यांनी आपल्या भाषणापूर्वी घाईघाईत व्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेऊन बोलायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांच्या भाषणापेक्षा त्यांनी केलेल्या चुकांचीच चर्चा रंगताना दिसू लागली आहे.
देशमुख कुटुंब काळगेंसाठी सक्रीय
महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजी काळगे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.काळगे यांच्यासाठी काँग्रेसचे आमदार अमित व धीरज देशमुख तसेच त्यांच्या मातोश्री वैशालीताई देशमुख या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.