ओबीसी नेत्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी – मराठा आरक्षणाला विरोध करणाºया नेत्यांवर मनोज जरागेंचा घणाघात

0 136

ओबीसी नेत्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी
– मराठा आरक्षणाला विरोध करणाºया नेत्यांवर मनोज जरागेंचा घणाघात

बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की, ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसीच्या नेत्यांनी विरोध केला आहे. मग ओपनच्या मतदारसंघांमध्ये ओबीसीच्या नेत्यांचं काय काम आहे? त्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी, असा घणाघातही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवत म्हटले की, मराठ्यांच्या एकीची भीती वाटत असल्याने महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान हे पाच टप्प्यांमध्ये घेतले. पाचही टप्प्यांमध्ये सभा घेण्यासाठी भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे महाराष्ट्रात आणणार आहेत. पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये येऊन सभा घ्यावी लागते इथेच मराठ्यांचा विजय झाला आहे. जवळ असलेल्या मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान घेतलं जात आहे, ही फक्त मराठा समाजाच्या एकीची भीती आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

उपोषण करून काहीही मिळत नाही – पंकजा मुंडे यांंच्या वक्तव्यांचा नेटकºयांकडून जाहीर निषेध

राज्यात मराठ्यांच्या भीतीने लोकसभेचं पाच टप्यात मतदान – मनोज जरांगे पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल

मनोज जरांगे यांचे सहकारी अमोल खुनेंवर अज्ञातांकडून भ्याड हल्ला – घटनेनंतर हल्लेखो फरार, खुनेंवर रूग्णालयात उपचार सुरू – मराठा समाजाकडून हल्ल्याचा निषेध करीत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी
एकीकडून मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करायचा आणि दुसरीकडे पुन्हा मतासाठी भीक मागायला यायचं, असा टोला मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाºया नेत्यांचे नाव न घेता लगावाला. यावेळी ते म्हणाले, राज्यात असे १३-१४ मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये ओपनची संख्या जास्त असूनही ओबीसीचे लोक उभा राहिले आहेत. इथे सुद्धा मराठ्यांचा विजय आहे.
मराठा आरक्षणाला विरोध करणाºयाला सोडू नका
मराठ्यांनी एक लक्षात ठेवावं. लेकरं आणि समाज डोळ्यासमोर ठेवून अन्याय डोळ्यासमोर ठेवून समोरचा कोणताही उमेदवार असू द्या मराठा आरक्षणाला विरोध करणाºयाला सोडू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.

महादेव जानकर समाजाचं नाव घेत स्वत:ची झोळी भरण्याचे काम करीत आहेत – यशवंत सेनेचे प्रमुख सुरेश बंडगर यांचा जानकरांवर जोरदार हल्ला

Leave A Reply

Your email address will not be published.