मनोज जरांगे यांचे सहकारी अमोल खुनेंवर अज्ञातांकडून भ्याड हल्ला – घटनेनंतर हल्लेखो फरार, खुनेंवर रूग्णालयात उपचार सुरू – मराठा समाजाकडून हल्ल्याचा निषेध करीत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी

0 398

मनोज जरांगे यांचे सहकारी अमोल खुनेंवर अज्ञातांकडून भ्याड हल्ला
– घटनेनंतर हल्लेखो फरार, खुनेंवर रूग्णालयात उपचार सुरू
– मराठा समाजाकडून हल्ल्याचा निषेध करीत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी

बीड : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन सरकारला धारेवर धरणारे संघर्षयोध्दा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी फोडण्यासाठी सरकारच्या वतीने नेहमी प्रयत्न होताना दिसत आहेत. याला अजय बारस्कर आणि वाळेकर हे बळी पडले. मात्र यांचा हवा तसा वापर झाल्यानंतर ही मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर काहीच परिणाम होत नसल्याचे राजकीय पक्षाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बारस्कर व वाळेकर यांची तोंडे बंद करायला लावली असावीत. मात्र मनोज जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणा-या आंदोलकांना सरकार नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने टार्गेट करीत आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी व कोपर्डी घटनेतील नराधमांना न्यायालयाच्या आवारात चोप देणारे अमोल खुने यांच्यावर तीन ते चार अज्ञात आरोपींनी दगडफेक करत भ्याड हल्ला केला. यामध्ये अमोल खुने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अमोल खुने यांचेवर हल्ला झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाट्यावर सोमवार (दि. १५) रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेनंतर आरोपी पसार झाले. या भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच हजारो मराठा समाज बांधवांनी रुग्णालयात धाव घेत अमोल खुने यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आलेल्या मराठा सामज बांधवांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

महादेव जानकर समाजाचं नाव घेत स्वत:ची झोळी भरण्याचे काम करीत आहेत – यशवंत सेनेचे प्रमुख सुरेश बंडगर यांचा जानकरांवर जोरदार हल्ला
गेवराई येथे भाचीला सोडून धानोरा येथे आपल्या गावी दुचाकीवरून परतत असताना गढी-माजलगाव महामार्गावरील अर्धमसला फाट्यावर अमोल खुने यांचेवर तीन चार अज्ञात आरोपींनी अचानक दगडफेक सुरु केली. यामध्ये अमोल खुने यांच्या डोक्याला दगड लागल्याने त्यांच्या डोक्यातून रक्तश्राव सुरू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून अमोल खुने यांना उपचारासाठी गेवराई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच हजारो मराठा समाज बांधवांनी रुग्णालयात धाव घेऊन खुने यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

खा. प्रितम मुंडेंसमोर चले जाव च्या घोषणा – घोषणांमुळे प्रितम मुंडेचा गावातून काढता पाय
अमोल खूणे मनोज जरांगे यांच्यासोबतच
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कोपर्डीच्या आरोपीच्या हल्ल्यातील इतर आरोपींनी मनोज जरांगे यांची साथ सोडलेली असली तरी अमोल खूणे मात्र शेवटपर्यंत मनोज जरांगे यांच्यासोबतच आहेत.
कोपर्डीतील नराधमांवर न्यायालयाच्या आवारात हल्ला
अमोल खुने हे गेवराई तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे ते सहकारी असून मराठा आंदोलनात सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वी कोपर्डी घटनेतील नराधमांवर न्यायालयाच्या आवारात हल्ला केला करून आरोपींना चोप दिला होता. या घटनेत चार जाणांचा समावेश होता त्यात अमोल खुने यांचा सहभाग होता.

मराठा मते मिळवण्यासाठी केलेली रणनीती ठरली फोल – मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीकडे मराठा समाजाने फिरवली पाठ

Leave A Reply

Your email address will not be published.