निष्क्रिय खासदारामुळे विकास निधी परत गेला – बजरंग सोनवणे यांची मुंडे भगिनींवर टीका

0 25

निष्क्रिय खासदारामुळे विकास निधी परत गेला
– बजरंग सोनवणे यांची मुंडे भगिनींवर टीका

बीड : बीड जिल्ह्यासाठी आलेला विकास निधी निष्क्रिय खासदारामुळे परत गेला. तर, वैद्यनाथ कारखाना फुकटात मिळाला म्हणून मुंडे भगिनींनी बंद पाडला, फुकट मिळालेला वैद्यनाथ कारखाना तो देखील चालवता आला नाही, म्हणून तो बंद पडला, असे म्हणत महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांनाही टोला लगावला.

खा. प्रितम मुंडेंसमोर चले जाव च्या घोषणा – घोषणांमुळे प्रितम मुंडेचा गावातून काढता पाय

मराठा मते मिळवण्यासाठी केलेली रणनीती ठरली फोल – मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीकडे मराठा समाजाने फिरवली पाठ
परळी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या बीड लोकसभेच्या प्रचार बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे बोलत होते. यावेळी त्यांनी खा. प्रितम मुंडे यांच्यावर टीका करताना पंधरा वर्षात भाजपच्या खासदारामुळे जिल्ह्याचा विकास झाला नसल्याचा घणाघाती आरोप निष्क्रिय खासदारामुळे निधी परत गेल्याचा आरोप करीत मुंडे बहीण भावावर निशाणा साधला.मागच्या तीन टर्ममध्ये बीड जिल्ह्याला भाजपचा खासदार दिला. मात्र विकास किती झाला? खासदारांनी बीड जिल्ह्यात काही कामं केली नाही, म्हणून आज ही अवस्था आहे. कोणीतरी म्हटलं, की बीड जिल्ह्यात रस्त्याचं जाळं झालं आहे. मात्र मी म्हणतो, हे आले मात्र सर्वच रस्ते अपूर्ण आहेत. कामं बाकी आहेत. त्यामुळे हजारो लोकांचे अपघात झाले, याला जबाबदार निष्क्रिय खासदार आहेत, असे म्हणत त्यांनी नाव न घेता प्रितम मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

महादेव जानकर समाजाचं नाव घेत स्वत:ची झोळी भरण्याचे काम करीत आहेत – यशवंत सेनेचे प्रमुख सुरेश बंडगर यांचा जानकरांवर जोरदार हल्ला
आशिया खंडातील पहिला साखर कारखाना
आशिया खंडातील पहिला साखर कारखाना म्हणून वैद्यनाथ कारखान्याची ओळख होती. तर इथेनॉलचा पहिला कारखाना म्हणून देखील त्याची ओळख होती. मात्र आता त्याची काय अवस्था आहे. तो बंद पडला. ज्यांना सर्वकाही फुकट मिळालं, त्यांना काय माहीत, असं म्हणत त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.

मोदींचा चेहरा भीतीदायक, तो भला चेहरा नाही – खासदार संजय राऊत यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

Leave A Reply

Your email address will not be published.