खा. प्रितम मुंडेंसमोर चले जाव च्या घोषणा – घोषणांमुळे प्रितम मुंडेचा गावातून काढता पाय

0 123

खा. प्रितम मुंडेंसमोर चले जाव च्या घोषणा
– घोषणांमुळे प्रितम मुंडेचा गावातून काढता पाय
बीड : भाजपने बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यामुळे पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे या परळी मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत. गाव भेटी दरम्यान बीडच्या राडी गावात प्रीतम मुंडे दाखल होताच चले जाव अशा घोषणा देण्यात आल्या. गावातील मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याने प्रीतम मुंडे यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.
बीड लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडून बीड जिल्ह्यात गाठीभेटी सुरू आहेत. यामुळे खासदार प्रीतम मुंडे परळी मतदारसंघातील राडी या गावी रात्रीच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यांना गावातील मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी मराठा सजाजातील तरूणांनी प्रीतम मुंडे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. मराठा समाजाने त्यांना पाहून चले जाव, चले जाव, मराठा विरोधी चले जाव अशा घोषणा केल्या.
खा. प्रीतम मुंडे यांचा ताफा गावात येताच मराठा समाजाकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. एक मराठा लाख मराठा, चले जाव, चले जाव मराठा विरोधी चले जाओ या घोषणा देण्यात आल्या. यामुळे प्रीतम मुंडे यांनी काढता पाय घेत परत जाणं पसंत केलं. राजकीय पुढाºयांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे, नंदकिशोर मुंदडा, जयसिंग गायकवाड,भीमराव धोंडे यांना देखील मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागल्याने या नेत्यांनी गावातून काढता पाय घ्यावा लागला होता.
पहिला प्रश्न धनगर समाजाचा मांडणार
धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी केलेल्या फोनवर बोलताना पंजता मुंडे यांनी धनगर समाजाला आम्ही यापूर्वी प्रतिनिधीत्व दिलं, आम्ही सर्व समाजाला प्रतिनिधीत्व दिल्याचं सांगितलं. तसंच मागचे काही दिवस दुर्लक्ष झाल्याचं मी मान्य करते, पण इथून पुढे मी प्रतिनिधीत्व देणार आहे. मला लेक समजून आशीर्वाद द्या, मी तुम्हाला अंतर देणार नाही. मी संसदेत पहिला प्रश्न धनगर समाजाचा मांडणार आहे, असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.