मराठा आरक्षणाच्या घोषणा देणं पाप आहे का? – मनोज जरांगे यांचा खा. अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न

0 62

मराठा आरक्षणाच्या घोषणा देणं पाप आहे का?
– मनोज जरांगे यांचा खा. अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न

जालना : नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या ताफ्यासमोर घोषणा देणाºया तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याच दिसत आहे. यावर प्रतिक्रीया देताना मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या घोषणा देणं पाप आहे का? तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवर केसेस दाखल करायला लागले आहात, असे म्हटले.
यावेळी ते म्हणाले की, गाडीच्या खाली उतरून तुम्हाला मारहाण केली का? मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या म्हणजे पाप आहे का? इतका सुड देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून उगवायला लागले आहेत. हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी रचलं आहे. हा देवेंद्र फडणवीस यांचा भरत आलेला खेळ आहे,असं देखील ते म्हणाले.
फोटो आणि नाव वापरू नका
माझा कोणालाही पाठिंबा नाही. मराठा समाजाने राज्यात एकही उमेदवार दिला नाही. त्यामुळे कोणी फोटो वापरू नका आणि नावही वापरू नका. तुम्ही एकाने वापरला तर बाकीचे पक्ष सुद्धा वापरतील. तुमच्या स्वाथार्साठी तुम्ही विनाकारण मराठा आंदोलनाचा आणि आरक्षणाचा राजकीय फायदा कोणीच घेऊ नका. जो जाणून-बुजून नाव घेतो किंवा फोटो वापरतोय त्यांना मराठा समाजाने मदत करू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.