महादेव जानकर समाजाचं नाव घेत स्वत:ची झोळी भरण्याचे काम करीत आहेत – यशवंत सेनेचे प्रमुख सुरेश बंडगर यांचा जानकरांवर जोरदार हल्ला

0 147
महादेव जानकर समाजाचं नाव घेत स्वत:ची झोळी भरण्याचे काम करीत आहेत
– यशवंत सेनेचे प्रमुख सुरेश बंडगर यांचा जानकरांवर जोरदार हल्ला
परभणी : मंत्री असताना महादेव जानकर यांनी आपल्या एकाही कार्यकत्यार्ला काहीही दिले नाही. त्यांनी परभणी जिल्ह्यातल्या एकाही कार्यकत्यार्ला त्यांनी कसल्याही प्रकारचा फंड दिला नाही. महादेव जानकर हे समाजाचं नाव घेतात आणि स्वत:चा पक्ष चालवतात. ते स्वत:चीच झोळी भरण्याचे काम करत आहे, असा हल्लाबोल करत धनगर समाजाने महादेव जानकर यांच्या पाठीशी न राहता महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यशवंत सेनेचे प्रमुख सुरेश बंडगर यांनी जोरदार हल्ला केला.
यशवंत सेनेचे सुरेश बंडगर हे यशवंत सेनेच्या पदाधिकाºयांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना म्हणाले की, मी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये परभणीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आणले. पक्षासाठी तन-मन-धनाने काम केले. पण दोन वर्षांपूर्वी पक्षात बेबनाव झाल्याने माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणखीन काय करायला पाहिजे? महादेव जानकर यांनी समाजासाठी काय केले आहे? जानकर मंत्री होते त्या काळात परभणी जिल्ह्यातल्या एका तरी कार्यकत्यार्ला काही दिले का? उलट जानकर हे समाजाचे नाव घेऊन स्वत:च्या स्वाथार्साठी पक्ष चालवतात आणि आपलीच झोळी भरण्याचे काम करतात. सध्या धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. धनगर समाजाला देशोधडीला लावण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासाठी यशवंत सेनेची स्थापना
महायुतीचे सरकार असताना सुरेश बंडगर  यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडी येथे धनगर आरक्षणासाठी तब्बल २१ दिवस आपल्या सहकाºयांसह प्राणांतिक उपोषण केले होते. सुरेश बंडगर हे सुरुवातीला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पण महादेव जानकर यांनी काही कारणावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. राष्ट्रीय समाज पक्षामधून हकालपट्टी केल्यानंतर सुरेश बंडगर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी यशवंत सेनेची स्थापना केली. आता ते यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुरेश बंडगर यांचेकडून महाविकास आघाडीचे समर्थन
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सुटली आणि महादेव जानकर हे परभणी लोकसभेचे उमेदवार झाले. महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सुरेश बंडगर यांनी जिल्ह्यातील प्रमुख धनगर समाजाच्या पदाधिकाºयांची बैठक घेतली. आणि या बैठकीमध्ये महादेव जानकर यांना समर्थन देण्याऐवजी महाविकास आघाडीच्या संजय जाधव यांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट लिहून सुरेश बंडगर यांचे आभार मानले.
बंडू जाधव वातावरण कलुषित होऊ देणार नाही
सुरेशदादा.. तुमची लढाई ही माझी देखील लढाई आहे. समाजासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून तुमच्या पाठीशी शक्ती उभा करू. सर्व समाज गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असताना कोणीतरी वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हा बंडू जाधव आहे, तोपर्यंत हे होऊ देणार नाही. सुरेशदादा, धनगर समाजाची चळवळ उभा करण्यात तुमचा प्रचंड मोठा वाटा आहे. असा सच्चा संघर्षयात्री माझ्या पाठीशी उभा राहिला, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे संजय जाधव म्हणाले.
Leave A Reply

Your email address will not be published.