समाज एकता अभियान तर्फे वैचारीक जयंती

0 75

समाज एकता अभियान तर्फे वैचारीक जयंती

मलकापूर : मलकापुर येथील सुर्योदय बालगृहा मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती समाज एकता अभियान तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र हे पुस्तक वाटप करून साजरी करण्यात आली.
समाज एकता अभियान हे महाराष्ट्र भर वैचारिक लोकांना एकत्र करून सामाजिक एकीकरणातुन सामाजिक समस्या सोडविण्याचे काम करत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने मलकापूर येथील बालगृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन चरित्र वापट करून बालगृहातील बालकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवना विषयी व कार्याविषयी माहिती होऊन, बालकांनी सुद्धा आयुष्यामध्ये स्वहीतासोबत राष्ट्रहीत जोपण्याची प्रेरणा मिळून आदर्श नागरिक तयार व्हावे. हा या मागचा उद्देश आहे. समाज एकदा अभियान हे मा. सतिश प्रघणे सर व विनोद सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. विनोद विरघट सर, सुमेध घनबहादुर सर यांचा सहकार्याने राबविण्यात येत असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक पातळीवरील विद्वान, अर्थतज्ञ, विधीतज्ञ व सामाजिक क्रांतीचे सर्वोच्च प्रणेते आहेत. जाती धर्मापलिकडे, विषमता, कर्मकांड, थोतांड झुगारून केवळ शिक्षणाच्या जोरावर सर्वसाधारण व्यक्तीही जागतिक स्तरावर स्वतःला सिद्ध करू शकतो. याचे जागतिक उदाहरण म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची, त्यांच्या ज्ञानाची व कार्याची माहिती बालपणापासून जर मुलांना मिळाली तर देशाच्या जडणघडणीत मुलांना खुप मोठी उर्जा निर्माण होईल. आणि खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हेच वैचारिक अभिवादन सुद्धा होईल. म्हणून समाज एकता अभियान तर्फे असे कार्यक्रम महाराष्ट्र भर घेण्यात येतात.

मलकापूर येथील सुर्वोदय बालगृहात पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते सतीश तेलगोटे, उमेश इंगळे, अँड. रोशन तायडे यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या वेळी मा. विनोद विरघट सर ,सुमेध घनबहादूर सर ,बंडूदादा वानखडे सर , धम्मदीप घनबहादूर सर , ॲड.रोशन तायडे सर आदी सामाजिक कार्यकर्ते मान्यवर सूर्योदय बालगृहातील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.