मराठवाड्याला आवकाळी पावसाचा जोरदार फटका -अवकाळी पावसामुळे २ हजार ७१६ हेक्टर वरील पिकाचे नुकसान

0 29
मराठवाड्याला आवकाळी पावसाचा जोरदार फटका
-अवकाळी पावसामुळे २ हजार ७१६ हेक्टर वरील पिकाचे नुकसान
बीड : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहेत. बीडसह परभणी, जालना, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस, गारपीट, वादळाचा फटका बसला आहे. यामध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून, शेकडो हेक्टरवरील ज्वारी, मका, बाजरी, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात प्राथमिक अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे २ हजार ७१६ हेक्टर पिकांवरील नुकसान झाले आहेत. तर ७७७ हेक्‍टरवरील फळ पिकांचे झालं नुकसान झाले आहेत.
अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे. मराठवाड्यात ८४ लहान-मोठी जनावर दगावली असून, ३५६ घरांची पडझड झाली आहे. गारपीटमुळे मराठवाड्यातील २०१ गाव बाधित झाली असून, ४ हजार ३०१ शेतकºयांना गारपिटीचा फटका बसला आहे.
लातूर जिल्ह्यात तीन दिवस सातत्याने अवकाळीचा फटका बसत आला आहे. यामुळे जिल्हाभरात  नऊ जनावर दगावली आहेत. तर, २५ एकर पेक्षा जास्त फळबागेचा आणि शेतीचं नुकसान झालं आहे.  तसेच जिल्ह्यात ९ जनावरे दगावली असून, लातूर आणि जळकोट तालुक्यातील काही ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले आहे. या दोन तालुक्यात मिळून जवळपास २५ एकर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे आकडेवारी तात्काळ प्रशासनाकडे येत आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे.
जिल्ह्याचे नाव                नुकसानग्रस्त क्षेत्र
छत्रपती संभाजीनगर १६३ हेक्टर
जालना १३४ हेक्टर
परभणी ५०  हेक्टर
हिंगोली २९७ हेक्टर
नांदेड ७४९ हेक्‍टर
बीड १०२१ हेक्टर
लातूर ५० हेक्टर
धाराशिव ३०८ हेक्टर
Leave A Reply

Your email address will not be published.