छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी टंचाईचे चटके – महानगरपालिका प्रशासन हतबल 

0 9
छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी टंचाईचे चटके
– महानगरपालिका प्रशासन हतबल 
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा वाढला असला, तरी छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. महापालिकेचे प्रशासन मात्र हतबल झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी जायकवाडीपासून ७०० आणि १२०० मिलीमीटर व्यासाची पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या दोन्ही योजना आता कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे २५०० मिलीमीटर व्यासाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या केले जात आहे. ७०० मिलीमीटर व्यासाच्या पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून, या योजनेच्या शेजारून ९०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आली आहे. अशा तीन योजनांमधून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. ९०० मिलीमीटर व्यासाच्या योजनेमुळे वीस एमएलडी पाणी वाढले आहे, तर ७०० आणि १२०० मिलीमीटर व्यासाच्या पाणी योजनेतून १३० ते १३५ एमएलडी पाण्याचा उपसा जायकवाडी धरणातून केला जातो. त्यापैकी ११५ ते १२० एमएलडी पाणी शहरात येते.
पालिका यंत्रणेच्या हाती अपयश
शहरात येणाºया ११५ एमएलडी पाण्यात ९०० मिलीमीटर व्यासाच्या योजनेमुळे वीस एमएलडी पाण्याची भर पडली असली, तरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात पालिकेच्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. जिन्सी, दिल्लीगेट, शहागंज, मरीमाता या ठिकाणच्या जलकुंभांमधून शहराच्या ज्या ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो, त्या त्या भागात सातव्या ते दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळा संपेपर्यंत तरी त्यात यश येणार नाही असे मानले जात आहे. त्याला पालिकेच्या अधिकाºयांनी देखील दुजोरा दिला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.