खासदार इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यात गळाभेट – गळाभेटीने राजकारणात नव्या चर्चेला उधाण

0 32
खासदार इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यात गळाभेट
– गळाभेटीने राजकारणात नव्या चर्चेला उधाण
छत्रपती संभाजीनगर : इदगाह मैदानावर नमाज  अदा करायला मुस्लिम समाज एकत्र झाला असतानाच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मैदानावर येत अनेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांची गळाभेटच घेतली. या गळाभेटीची चर्चा रंगू लागली आहे.
२०१९ च्या निवडणुकीमध्ये खासदार जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा ४ हजार २३४ मतांनी पराभव केला होता तेव्हापासून सार्वजिक कार्यक्रमात जलील आणि खैरे यांच्यामध्ये फारसा संवाद होताना दिसत नाही. मतदारसंघातील अनेक भागात रमजान सणाच्या शुभेच्छा देणारे अनेक संदेश अनेक भागात फलकांवर लागले आहेत. एरवी असे चित्र दिसत नसे. गंगा जमनी तहजीब वगैरे शब्द या शहरात चालणार नाहीत, अशीच आतापर्यतची शिवसेनेची भूमिका असे. हिरवा साप , त्याची गरळ, रझाकाराची पिलावळ, औरंगजेबाची, मोघलांची औलाद अशा शेलक्या विश्लेषणांनी एमआयएमचे वर्णन केले जात असे. मा़त्र, शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा शिवसैनकांपर्यंत पोहचवला जाऊ लागला.
शिवसेना हा भाजप विरुद्ध लढणारा पक्ष म्हणून मुस्लिम भागातही शिवसेनेविषयी आपुलकी वाटू लागली. त्यातून निर्माण झालेल्या भावनेतून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रमजानच्या शुभेच्छांचे फलकही लावले. या गळाभेटी बाबत बोलताना भाजपचे लोकसभा प्रभारी समी्र राजूरकर म्हणाले, ठाकरे गटाचा बेगडी हिंदुत्त्ववादी चेहरा आता उघड झाला आहे एकेकाळी आक्रमक असणारी शिवसेना आता मतांसाठी कणाहीन झाल्याचा आरोप केला जात आहे.
खा. इम्तियाज जलील गळ्यात पडले
इदगाह मैदानात प्रार्थना झाल्यानंतर मुस्लिम बंधुना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. तेव्हा अचानक इत्मियाज जलील तेथे आले. त्यांचा हातात हात मी घेत शुभेच्छा दिल्या. पण ते गळ्यात पडले. आज भेटावेच लागते असे म्हणाले. पण मी त्यांना झिडकारले. पण ते गळ्यात पडले, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
Leave A Reply

Your email address will not be published.