पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तालुकास्तरावर करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश

0 12

पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तालुकास्तरावर करा
– जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पाणी टंचाई मुकाबला करताना पाण्याचे उपलब्ध स्रोत, दैनंदिन गरज आणि त्यावरील उपाय करीत जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तालुकास्तरावर करावे व तसा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा. पाण्याचा अतिरिक्त वापर थांबवावा, पाणी पुरवठा करणाºया टँकरवर जीपीएस यंत्रणा लावा, असे , असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन पाणी टंचाईचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रशासक विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार पल्लवी लिगदे; तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा, अधिग्रहित विहीरी, लाभक्षेत्रातील विहिरींच्या अधिग्रहणाबाबत भूजल अधिनियमातील तरतुदी; तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींना अनुसरून प्रस्ताव पाठवावेत. पाण्याचा अतिरिक्त वापर थांबवावा. टँकरने पाणीपुरवठा करताना टँकरला जीपीएस लावण्यात यावेत. टँकरच्या फेºयांचे नियोजन करावे. त्याचे गावात रजिस्टर ठेवून त्यावर गावकºयांच्या स्वाक्षºया घ्याव्यात. लॉगबुक तयार करावे, असे निर्देश या प्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
टंचाईवर उपाययोजना राबवा
गावांना पाणी पुरवठा करणाºया टँकरच्या फेºया व टँकर भरण्याचे ठिकाण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करावी. जिल्ह्यात टंचाई उपाययोजना राबवताना जलपुनर्भरण, गाळ काढणे अशी कामे प्राधान्याने घ्यावीत. जेणेकरून पुढील वर्षात टंचाई निर्माण होणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.