उपोषण करून काहीही मिळत नाही – पंकजा मुंडे यांंच्या वक्तव्यांचा नेटकºयांकडून जाहीर निषेध

0 56

उपोषण करून काहीही मिळत नाही
–  पंकजा मुंडे यांंच्या वक्तव्यांचा नेटकºयांकडून निषेध

बीड : बीडमधील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, सध्या अनेकजण उपोषण करत आहेत. पण उपोषण करून काहीही मिळत नाही. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चयार्चा धक्का बसला आहे. जरांगे यांच्या उपोषण काळात तटस्थ भूमिका घेणाºया पंकजा यांनी अचानक यूटर्न कोणाºया इशाºयानुसार घेतला असावा अशी चर्चा सुरू आहे. मुंंडे यांच्या या वक्तव्याचा मनोज जरांगे कोणत्या शब्दात समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महादेव जानकर समाजाचं नाव घेत स्वत:ची झोळी भरण्याचे काम करीत आहेत – यशवंत सेनेचे प्रमुख सुरेश बंडगर यांचा जानकरांवर जोरदार हल्ला
पंकजा मुंडे या भाजपच्या तिकीटावर बीडमधून लढत आहेत. त्यांनी जाटनांदूर येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयावर आपले मत व्यक्त केले. ही निवडणूक जिल्ह्याच्या अस्मितेची आहे. मला दिल्लीत जाण्याची हौस आहे म्हणून उमेदवारी मागितली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून उमेदवारी दिली आहे. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी ही माझी मागणी होती. पण कोअर कमिटीने माझं नाव घेतलं. जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती माझ्या दारावर आला असात मी कधीच त्याला त्याची जात विचारली नाही. प्रत्येकाला मी मदत करत आले. निवडणुकीत राजकारण आणण्याची गरज नाही. माझ्या हातात तराजू आहे, मी उज्ज्वल भविष्यात अडचण आणणारी परिस्थिती पाहत आहे, असं सांगतानाच नरेंद्र मोदी हे तिसºयांदा पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चक्रव्यूहात अडकवलंय – माजी मंत्री शिवसेना नेते सुरेश नवलेंकडून एकनाथ शिंदेना घरचा आहेर
पुढच्यावर्षी परळीपर्यंत रेल्वे येईल
यावेळी त्यांनी बजरंग सोनावणे यांच्यावर नाव न घेता टीका केली. ज्यांना ५ लाख ९ हजार मते गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळाली. त्यांनी काय काम केलं हे मी विचारणार नाही, असा टोला त्यांनी सोनावणे यांना लगावला. मी निवडणूक हरल्यानंतरही पाच वर्षात हजारो कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवले. माझ्या जिल्ह्यातील रस्ते चांगले केले, रेल्वे आणली. पुढच्यावर्षी परळीपर्यंत रेल्वे येईल, असं त्यांनी सांगितलं.
मला निवडून द्या
मुकेश अंबानी भेटले की मला कैसी हो पंकजा म्हणून विचारतात. त्यांच्याकडून बीडमध्ये मोठे उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मला बांधणारा धागा बनायचे आहे. कात्री नाही. आता मला संधी द्या. पुढच्यावेळी तुम्ही म्हणाल त्याला मी खासदार करेन. जिल्ह्याच्या विकासासाठी मला निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

निष्क्रिय खासदारामुळे विकास निधी परत गेला – बजरंग सोनवणे यांची मुंडे भगिनींवर टीका

पंकजा मुंडे यांना काही कळत की नाही?

उपोषणामुळे काही मिळत नाही म्हणणाºया पंकजा मुंडे यांना काही कळत की नाही? मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे गावची गाव ओबीसी आरक्षणाचा फायदा घेत आहेत. हे केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन आणि उपोषणाचे फलित आहे. पण राजकारणी नेते एकाच माळेचे मणी असल्याने ते नेहमी आंदोलन व आंदोलकांना बदनाम करण्यासाठी अनेक क्लुप्त्या करण्यात पटाईत असतात त्यात पंकजा मुंडे कुठेच कमी पडत नसल्याचे दिसत असल्याचे मत मराठा समाजाकडून व्यक्त केले जात आहे.

मोदींचा चेहरा भीतीदायक, तो भला चेहरा नाही – खासदार संजय राऊत यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

Leave A Reply

Your email address will not be published.