मी जात कधीही काढणार नाही – पंकजा मुंडे यांचा सुर नरमला

0 294

मी जात कधीही काढणार नाही
– पंकजा मुंडे यांचा सुर नरमला

बीड : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. बीडमध्येही महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. यूट्यूब उघडलं की पंकजा मुंडे पडणार असं येत आहे. मला कुठलेही कपट कारस्थान न करता मतदान करा. मी जात कधीही काढणार नाही. तुमचे मतदान मी कर्ज समजेन. व्याजासकट परत करेन, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केल्याने त्यांचा सूर मावल्याचे दिसत आहे. त्यांनी आंदोलन करून काही मिळत नसते असे म्हणत मनोज जरांगे यांचे नाव न घेता टीका केल्यानंतर त्यांना होणारा वाढता विरोध पाहून पंकजा मुंडे यांनी युटर्न घेतल्याचे दिसत आहे.

राजकीय पक्ष; अंधभक्त निर्मीतीचे कारखाने ! नवनाथ दत्तात्रय रेपे
आताची लोकसभा निवडणूक ही उज्वल भविष्याची आहे. विधानसभा निवडणूक पुढे आहे. ही निवडणूक संसदेची आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा. आपल्या बीडमध्ये मी सर्वात मोठं कॅन्सर रुग्णालय आणि उद्योग आणणार आहे. सुरेश धस हे माज्यासोबत सदैव आहेत. माझी एकट्याची लीड नव्हे तर सर्व मतदारांची लीड राहील. कलीयुगात अस्त्र शस्त्र घेऊन पुढे चालावं लागेल. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे. माझा विजय निश्चित असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी या भागात येणं नवीन नाही. २०१४ ला सुरेश धस आमच्याविरोधात राष्ट्रवादीकडून उभे होते. मी पालकमंत्री झाल्यावर जिल्हा परिषदेमध्ये सात सदस्य सुरेश धस यांनी दिल्यानंतर जिल्हा परिषद ताब्यात घेतली. लहान बहिणीला जेवढे लीड दिलं. त्यापेक्षा छटाक भर मते मला जास्त द्या, असे आवाहन त्यांनी केले.
मोदीजी विचारतील पंकजा कुठे आहे?
मी २२ वर्ष राजकारणात आहे. मग आता आभाळ का कोसळले आहे? ही निवडणूक संसदेची आहे. मोदीजी मला विचारतील पंकजा कुठे आहे म्हणून तुम्हाला देखील अभिमान वाटेल बीडचे नाव दिल्लीत घुमेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
परळीकर हैराण, धनजंय मुंडेला पंकजाकडून घरचा आहेर
बीड जिल्हा हा माझं घर आहे, मी तुमची लेक आहे. आता मला निवडून द्या. परळीचे लोक सध्या परेशान आहेत. पाच वर्ष झाले हैराण आहेत, असे पंकजा मुंडे बीडमधील सभेत म्हणाल्याने त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे. यावर धनंजय मुंडे काय प्रतिउत्तर देतात याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.

मतदान करण्यासाठी कामगारांना एक दिवसाची सुट्टी द्या – सुट्टी देण्‍याबाबत शासन परिपत्रक निर्गमित

शृंगारेंच्या बुलेट ट्रेनने थेट बावनकुळेंचे सुळे काढले – भाजप उमेदवार सुधारक शृंगारे यांच्या भाषणाची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा

साठ वर्षांपासून मराठा समाजाचे नाकारलेले ओबीसी आरक्षण परत करण्याची गरज – ओबीसींच्या स्वयंघोषित नेत्यांनी झोपेचे सोंग न घेता सत्य समजून घेणे गरजेचे अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांचे आवाहन

Leave A Reply

Your email address will not be published.