साठ वर्षांपासून मराठा समाजाचे नाकारलेले ओबीसी आरक्षण परत करण्याची गरज – ओबीसींच्या स्वयंघोषित नेत्यांनी झोपेचे सोंग न घेता सत्य समजून घेणे गरजेचे अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांचे आवाहन

2 1,065

साठ वर्षांपासून मराठा समाजाचे नाकारलेले ओबीसी आरक्षण परत करण्याची गरज

– ओबीसींच्या स्वयंघोषित नेत्यांनी झोपेचे सोंग न घेता सत्य समजून घेणे गरजेचे अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांचे आवाहन

बुलढाणा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवली सराटी येथे मागिल १४ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. या आंदोलनाची दखल राज्यातील सर्व राजकीय नेत्यांनी घेतली असली तरी मात्र ओबीसी संघटना आणि त्यांचे नेते यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या मागणीला विरोध होताना दिसत आहे.

यावर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपली प्रतिक्रिया देऊन साठ वर्षांपासून मराठा समाजाचे नाकारलेले ओबीसी आरक्षण परत करण्याची गरज असल्याचे सांगत ओबीसींच्या स्वयंघोषित नेत्यांनी झोपेचे सोंग न घेता सत्य समजून घेणे गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया जशीच्या तशी

काही ओबीसी नेत्यांची चूकीची ओरड 
मराठवाड्यातील मराठा म्हणून ओळख असलेल्या कुटुंबांची प्रत्यक्षात सरकारी दप्तरी नोंद निजामशाही पासून म्हणजेच सुमारे दोनशे वर्षांपासून कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. इंग्रज व शेकडो अन्य मानवशास्त्रज्ञांनी मराठा व कुणबी एकच असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले आहे . तसेच महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने देखील हीच मांडणी केलेली आहे. असे असतानाही आजतागायत मराठवाड्यातील मराठा समाजाला गाव रजिस्टर, शाळा दाखले अशा ठिकाणी शंभर पेक्षा जास्त वर्षांपासून कुणबी नोंद असूनही ओबीसी आरक्षण नाकारण्यात आले आहे . हा सामाजिक अन्याय ठरवून झाला आहे . तर आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा मधील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू केले आहे .
तर त्याचवेळी मराठवाड्यातील कमीतकमी तीन पिढ्यांचे भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. ते कमी करण्यासाठी मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी केली होती …. ती योग्य आहे .
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मध्यमार्ग काढून ज्यांच्या नोंदी कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी आहेत त्यांना ओबीसी आरक्षण देण्याची हक्काची मागणी मान्य केली आहे. यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही. याउलट साठ वर्षांपासून मराठा समाजाचे नाकारलेले ओबीसी आरक्षण परत करण्याची गरज आहे. कारण तो लाभ अन्य ओबीसींना मिळाला आहे .
थोडक्यात काही ओबीसींचे स्वयंघोषित नेते समाजातील बंधुभाव एकात्मता शांतता बिघडवणारी वक्तव्ये करत आहेत असे लक्षात येते. त्यांनी झोपेचे सोंग न घेता सत्य समजून घेणे गरजेचे आहे. चूकीची ओरड बंद करावी अशी विनंती आहे.
प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या क्लिप मुळे मराठा कुणबी समाज अतिशय नाराज आहे. त्यात भर टाकू नये यासाठी ही विनंती आहे .

पुरुषोत्तम खेडेकर चिखली .
दिनांक ८-९-२०२३ .

2 Comments
  1. Rambhau Kshirsagar says

    बरोबर आहे आभ्यास करुण बोलनारी मानस पाहिजे

  2. Walmik Bhagat says

    सर्वचसमाजातमागासआहेत.म्हणूनचघटनेततशीतरतूदकेलीआहे.त्यासाठीsc,st,obc,sbc.एत्यदि.सर्व महाराष्ट्रभर मुळात जो मराठा समाज आहे तो सर्व बाळ ला बारा बलुतेदार 18 अलुतेदार जाती मिळून आहे.त्यामुळे यांच्या जाती जसं कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी सुतार लोहार माळी अशा पद्धतीने आहेत.त्यामुळे मराठा हा कुणबीज असून त्याला इतर मागासवर्गीय समाविष्ट करण्यासाठी पुरेशा पुरावे ची गरज नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.