प्रभाग क्र.2 बरकत नगर येथील रोड,नाली,विद्युत पोल,पाईप लाईनचे कामे त्वरित करा. – राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निवेदनाद्वारे न. प.ला मागणी

0 35

प्रभाग क्र.2 बरकत नगर येथील रोड,नाली,विद्युत पोल,पाईप लाईनचे कामे त्वरित करा

– राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निवेदनाद्वारे न. प.ला मागणी

 

परळी (वार्ताहर) : शहरातील प्रभाग क्र. 2 बरकत नगर, रोड, नाली, विद्युत पोल लाईट, पाणी पाईप लाईन अदी नागरी सुविधांचे कामे त्वरित करण्याची मागणी परळी नगर परिषदेकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतिने निवेदनाद्वारे केली आहे
परळी नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्र. बरकत नगर मधील नागरी समस्या निर्माण झाले असून बरकत नगर बकश भाई फुटवेअर यांच्या घरापासून ते उस्मानी मस्जीद पर्यंत रोड करणे,रज्जाक किराणा दुकान ते निसार भाई यांच्या घरापर्यंत रोड करणे,प्रकाश किराणा दुकान ते फिटवेल टेलर यांच्या घरापर्यंत रोड करणे,फतेह नगर गमामा मस्जीद ते रेल्वे गेट पर्यंत रोड करणे,जमजम कॉलनी मधील नळाची पाईप लाईन व रोड नाली करणे. बरकत नगर येथील 50 फुट रस्त्याचे काम अर्धवट झाले असून दोन्ही बाजुने नाल्याचे काम पण तात्काळ पुर्ण करणे,बरकत नगर, खुदबे नगर, इरशाद नगर, फत्तेह नगर या ठिकाणी बंद पडलेले पथदिवे व नवीन पथदिवे टाकणे,प्रभाग क्रमांक 2 मध्ये बरकत नगर येथे जिथे जिथे ड्रेनेजचे कामे पूर्ण झाली आहेत त्यावर चेंबरपण टाकण्या आलेले नाही त्यावर रोड अजून झालेला नसल्याने नागरीकांना गैर सोय होत असल्यामुळे रस्ता करणे. बरकत नगर प्रभागातील अनेक ठिकाणी बंद पडलेले बोअर दुरुस्त करणे,बरकत नगर येथे आवश्यक त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल टाकणे,बरकत नगर भागातील आवश्यकत्या ठिकाणी मुरुम टाकणे यासह काही नागरिकांच्या समस्यावर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने परळी नगर परिषदेला निवेदन दिले आहे. नगर परिषदने नागरी सुविधांचे कामे लवकरात लवकर करावे अन्यथा न.प. कार्यालयासमोर लवकरच अमरण उपोषण करण्यात असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष शंकर शेजुळ, शहराध्यक्ष सय्यद फिरोज जब्बार राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब भाई,ताजू भाई, शेख खदिर, पठाण जमाल, अरबाज खान ,शेख रशीद ,गणेश शेळके, इमरान भाई ,अक्रम भाई यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.