तुमच्या हातच्या नैवेद्याने तो बाटतोय ?

0 336
तुमच्या हातच्या नैवेद्याने तो बाटतोय ?

 

रेपे नवनाथ दत्तात्रय
‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’
या पुस्तकाचे लेखक

 

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे हे त्यांच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात म्हणतात की, केवळ एक शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदुच्या तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते. तर मग प्रश्न पडतो की, केवळ शिवाजी या नावापुढे जर सर्वच देवच बाद होत असतील तर आमचे स्वतःला उच्चशिक्षित समजणारे लोक काय म्हणून आजपर्यंत एकाचेही विघ्न दूर न करणा-या गणेशाच्या नावाने एवढा आकांडतांडव करून काकाड आरती माकड आरती करण्यात वेळ वाया घालवत असतील ? गाडगेबाबा म्हणतात की,
‘मळा पासून कधी, कोणी जन्म घेतं असते का ?
एक मूर्ती तयार व्हावी, एवढा मळ कुणी अंगावर ठेवते
का ?’.
आमचा (बहूजन भौताड कम्युनिटी) बीबीसी समाज वर्षातील तीनशे चौसष्ट दिवस बुध्द शिव फुले शाहू आंबेडकर आण्णाभाऊ यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करताना स्वतःची तुंबडी भरताना दिसतो मात्र गणेश उत्सवात त्यांची मती भष्ट होते की काय ? कारण हे तथाकथित भामटे मात्र लोकांना महापुरूषांच तत्वज्ञान सांगतात अन् घरी आपल्या बायका पोरासोबत ज्या गणपतीला महात्मा फुले ढंबुढे-या म्हटले त्याची हार फुले टाकून आरती ओवाळताना दिसतात. म्हणजे त्यांनी महापुरुषांच्या विचारांशी केलेली हीच ती गद्दारी नव्हे तर काय ? गाडगेबाबा म्हणतात की,
अर्धा किलो उंदराले, पन्नास किलो झेपेल का ?
बसलं त्यावर ठाम मांडुनी, तर उंदीर तरी जिवंत राहिल का ?’.
आमच्या घरातील लहान मुलांना प्रश्न पडतो की, मुर्ती तर माणसाची, पण त्याचे तोंड हत्तीसारखे दिसते तेव्हा मूल त्या मुर्तीकडे पाहुन फिदीफिदी हासतात पण स्वतःला उच्चशिक्षित, बाल – युवा व्याख्याते मात्र याला डोक्यावर घेऊन मिरवताना दिसतात म्हणून तर या उच्चशिक्षितांना सांगाव वाटत की, तुम्ही प्रथम महात्मा जोतिबा फुलेंच समग्र वाङमय वाचा कारण महात्मा जोतिबा फुले म्हणतात की,
‘पशुपरी सोंड पोर मानवाचे !! सोंग गणोबाचे नोंद ग्रंथी !!
बैसे उंदरावरी ठेवूनिया बुड !! फुकितो शेंबूड ! सोंडेतून !!
अंत्यजासी दूर, भटा लाडू देतो !! नाकाने सोलीतो ! कांदे गणू !!
चिखला तुडवूनी बनविला मोरया !! केला ढंबू-ढेर्या ! भाद्रपदी !!.
तसेच डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या प्रतिज्ञेत म्हणतात की, मी गौरी गणपती यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. पण आज त्यांचेच खा. रामदास आठवले सारखे ब्राम्हणवादी बांडगुळ मात्र या काल्पनिक पात्राची पुजा करताना दिसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर एक गायक म्हणतो की,
‘निळाच झेंडा, निळीच टोपी
निळा निळा तु बनतो
लय निळा निळा तु बनतो
पण तु घरात गणपती आणतो
मग कशाला जयभिम म्हणतो ?’
रामायणातील सत्य या पुस्तकाचे लेखक पेरियार रामासामी यांनी १९५३ साली बुध्द पौर्णिमेच्या दिवशी गणपतीच्या मुर्त्या फोडल्या होत्या हे बहुजन समाज कधी समजून घेणार ? पेरियार रामासामी यांना समजून घ्यायला डोक्यात मेंदू असावा लागतो. ज्यांच्या डोक्यात गोबर गोमुत्र आहे त्यांना पेरियार रामासामी व त्यांची पुस्तक पचणं अवघड आहे, हे आजच उघड नागड वास्तव आहे. तसेच पुढे गाडगेबाबा म्हणतात की,
‘नुकत्याच जन्मल्या बाळाले, हात्तीचं डोकं लागेल का ?
डोकं हात्तीचं लावूनी, तो माणूस बनून वागेल का ?
वैद्य असा होऊन गेला, त्याले जगाने नाही पाहिले का ?
डोकं जनावराचे माणसाला जोडे, असं कुठं होऊ राहिले का ?’.
मा. प्रबोधनकार सीताराम ठाकरे ०७ फेब्रु.१९५८ रोजी गणपतीचे रहस्य मध्ये म्हणतात की, ‘ब्राम्हण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवुन बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले. आणि देवांची निर्मिती करुन स्वतःला देव घोषीत केल, आणी काल्पनिक पात्राच्या नावावर संपुर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजा कडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करुण ब्राह्मण धन दौलत मिळवतात  प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो.’ परंतू त्यांचे स्व. बाळासाहेब ठाकरे असताना मुख्यमंत्री मनोहर जोशींनी (ब्राम्हण) मातीच्या गणपतीला दूध पाजण्याचा पराक्रम केला. भट ओळखा कारण भट तुम्हाला पुर्वीपासूनच अंधश्रद्धेच्या खाईत ढकलत आहेत हा इतिहास आहे. तसेच गणपतीविषयी विद्रोही कवी विश्वांभर वराट हे त्यांच्या अंभगातून म्हणतात की,
गणपती तुझे काय नियोजन ! उंदीर वाहण बसावया !
बैसता त्यावरी होऊ नये घात ! उंदीर बोळात घुसताची !
तुझा तो मोदक ठेव सांभाळुनी ! खातो करांडुनी उंदीर बा !
म्हणे विश्वंभर गणोबा विकृत ! देव नव्हे भूज वाटे मज !.
त्यापुढे विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘करूनिया गोबराचा गणपती ! पुढे धुपबत्ती लावियली !
तरी येईल का त्याशी सुंगधीता ! आणि पवित्रता कोणेकाळी !
करील तो काय सृष्टीनियंत्रण ! आरपार शेण भरलेले !
म्हणे विश्वंभर जळण चुलीचे ! इतुके ही त्याचे मोल नाही !’
मराठा समाजाला वाटत गणपती आमच दैवत असून तो विघ्नहार्ता आहे. कधी कधी तर सुपारीच गणपती आहे अस समजून सुपारीला पाणी लावणारे मराठा समाजातील बहाद्दर पाहीलेत. त्यामुळे त्यांना सागावं वाटत की, मागिल काही दिवसापुर्वी पुण्यात एका मराठा समाजातील यादव नावाच्या महीलेने मेघा खोले या ब्राम्हण महीलेच्या घरी चतुर्थीच्या दिवशी स्वयंपाक बनवला होता पण खोलेंना नंतर समजल की, यादव या मराठा आहेत तेव्हा त्या ब्राम्हण समाजातील खोले म्हणाल्या की , तुम्हा शुद्र मराठा महिलेच्या हातच्या नेवैद्याने आम्हा श्रेष्ठ ब्राह्मणांचा देव बाटला, त्यांनी  यादव या मराठा महीलेविरोधात तक्रार दाखल केली कारण त्यांचा ढंबुढे-या नावाचा तथाकथित देव मराठ्यांच्या स्पर्शाने बाटला होता. म्हणून आता तरी मराठा समाजाने समजून घ्याव की, मराठा समाजाच्या हातच्या नैवेद्याने जर भटांचे काल्पनिक देव बाटत असतील तर त्या भटा ब्राम्हणांचा आणि आपला धर्म व देव एक असेल ? याचा विचार करा. याविषयी गाडगेबाबांच्या शब्दात सागावं वाटत की,
भाकड अश्या कथा रचुनी, देवाच्या नावे तुले लुटले का ?
थोतांड सारं खरं केलं, आन बुद्धीला तुह्या पटलं का ?
सांग आते, भोळ्या जनतेला का मूर्ख केले, असा जवाब तू त्याले मागशील का ?
अंधभक्तीची काळी पट्टी तही, मेंदुवरून दूर करशील का ?
महात्मा फुलेंनी सुरू केलेली शिवजयंती खुप मोठ्या प्रमाणात साजरा होतोय ही गोष्ट भटमान्य टिळकाच्या लक्षात येताच शिवजयंती वरून लोकांच लक्ष विचलीत करण्यासाठी स्वयंमान्य टिळकाने काल्पनीक ढंबुढे-याच स्तोम माजवले अन् बहूजन समाज त्याला बळी पडला. म्हणून जोतिबा फुले म्हणतात की,
‘गनोबाची पूजा भाविका दाविती !! हरामाच्या खाती ! तूप-पोळ्या !!
जै मंगलमुर्ती जै मंगलमुर्ती !! गाती नित्य किर्ती ! टाळ्यासह !!’
भटा ब्राम्हणांनी आजपर्यंत बहूजन समाजापुढे काल्पनिक   पात्र रंगवून तो आपला विघ्नहर्ता सुखकर्ता आहे अस सांगितल त्यामुळे बहूजन समाज त्या कर्दमात फसत गेला. यख काल्पनिक ढंबुढे-याविषयी जगदगुरू तुकोबाय म्हणतात की, गणोबा विक्राळ ! लाडुमोदकांचा काळ !
वारकरी सांप्रदायाचा पाया रचनारे संत नामदेव महाराज म्हणतात की, इतर देवांचे न पाहू तोंड ! विठ्ठल माझा प्रचंड !!
तर मग प्रश्न पडतो की, नामदेवांनी सांगितलेला विठ्ठल माझा प्रंचड आहे तर मग बहुजन समाजाला इतर देवांची गरजच काय ? कशाला पाहीजे विठ्ठला व्यतिरिक्त इतर थोंताड पण आमच्या सुशिक्षित लोकांना आजही गाय गोबर गोमुत्र साप विंचू पाल माकड कुत्र डुक्कर कासव हत्ती मोर उंदीर यांच्यात देव दिसतो ? कारण त्याची पुजा ते करताना दिसतात ही खुप मोठी शोकांतीका आहे. आजपर्यत या विघ्नहर्त्याने एकातरी बहूजन कुटुबांतील व्यक्तीच विध्न दुर केल आहे ? म्हणून बहुजन समाजाला तुकोबांच्या शब्दात सागावं वाटत की, वांझेंने दाविले ग-हवार लक्षण ! चिरगुटे घालून वाथयाला !
बहूजन समाजाला सागावं वाटत की, भटांच्या नापिक डोक्यातून निघालेल्या सुपिक काल्पनीक कथांच्या नाही लागून विघ्नहर्त्या व सुखकर्त्यांच्या नादी लागून आपला आमुल्य वेळ व पैसा किती दिवस वायफळ घालवणार ? म्हणून तर गाडगेबाबा म्हणतात की,
‘वैद्य असा होऊन गेला
त्याले जगाने नाही पाहिले का ?
डोकं जनावराचे माणसाला जोडे
असं कुठं होऊ राहिले का ?’
एकही दिवश शाळेत न गेलेल्या गाडगेबाबांना गणपतीचं थोतांड आणि लचांड समजल पण तुम्ही उच्चशिक्षित असूनही काल्पनिक पात्राकडून सुखाची व विघ्न निवारणाची अपेक्षा करतात तेव्हा आपण सुशिक्षित आहोत का ? हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण उच्चशिक्षित असणारेच महापुरुषांच्या विचारावर चालत नाहीत त्या शिकलेल्या लोकांविषयी माजी न्यायधीस पी.बी. सावंत म्हणतात की, ‘हा वर्ग आपल्याच महापुरुषांच्या विरोधात काम करतो’.
काल्पनिक पात्रावर किंवा थोंताडावर काही बोललं तर बुध्दीची कमतरता असणारांच्या भावना दुखावल्या जातात त्यामुळे मा.आ. केशवराव धोंडगे म्हणतात की, त्यांनी आपल्या भावनेचा विमा उतरावा किंवा त्या भावनेचा पुष्पगुच्छ करून तो इअर कंडीशनमध्ये ठेवावा जेणेकरून त्याला इजा पोहोचणार नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘श्रध्देपोटी केला शेणाचा गणेश ! आळ्यांची पैदास थांबेल का ? !
गुळाचा गणेशा लागती मुंगळे ! मेणोबा वितळे तापासंगे !
केला कापराचा हवेत विरतो ! पाण्यात जिरतो लवणाचा !
म्हणे विश्वंभर नवल ते काय ! देव होतो व्यय तरी कैसा ? !’
सत्य आम्हा मनी ! नव्हे गबाळाचे धनी !
देतो तिक्ष्ण उत्तरे ! पुढे व्हावयासी बरे !
Leave A Reply

Your email address will not be published.