आरोपीच्या शरीरावर जीपीएस यंत्र बसवून आरोपीला कैद केले जाणार – ओडिसातील नवीन पटनायक सरकराचा निर्णय

0 14

आरोपीच्या शरीरावर जीपीएस यंत्र बसवून आरोपीला कैद केले जाणार
– ओडिसातील नवीन पटनायक सरकराचा निर्णय

भुवनेश्वर : आडिसाच्या तुरूंगातील कैद्याची संख्या कमी करण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलणार आहे़ गैर आरोपींचा सामना करणाºया अंडरट्रायल कौद्यांना यापुढे तुरूंगात ठेवले जाणार नाही तर त्यांच्या घरतच बंदिस्त केले जाणार आहे़ यासाठी नवीन पटनायक सरकार जीपीएस सक्षम ट्रॅकिंग उपकरणे वापरणार आहे़ कैद्याच्या शरीरावर जीपीएस बसवून त्यांच्यावर नजर ठेवणारे ओडिसा हे पहिले राज्य ठरणार आहे़
अंडरट्रायल कौद्यांना तुरूंगाऐवजी घरातच बंदीस्त करून तुरूंगातील गर्दी कमी करणे हा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे़ या उपक्रमामुळे तुरूंगातील गर्दी तर कमी होणारच आहे पण सरकारचा कैद्यांवर होणारा खर्चही कमी होणार आहे़ अमेरिकेतही अशा प्र्रकारची उपकरणे वापरली जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे़
ट्रॅकिंग डिव्हाइसचा खर्च
ओडिसा सकारने कैद्यांना घरातच कैद करून ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस घेतले जाणार असून त्यांची किंमत १० हजार ते १५ हजार रूपये आहे़ हे उपकरण कैद्याच्या घोट्याला जोडले जाणार आहे़ या जीपीएसमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर तो अलर्ट देणार आहे़
क्षेत्राची मर्यादा ठरवून दिली जाणार
आरोपीवर बसवलेले उपकरण विशिष्ट क्षेत्र ठरवून त्याचा प्रोग्राम केला जाईल़ संशयित व्यक्तीने अधिकृत मर्यादेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर ताबडतोब पोलिसांना सूचित केले जाणार आहे, यामुळे त्याची जामीन रद्द होऊन त्याला परत तुरूंगात पाठवले जाणार आहे़
कैदांनाच खरेदी करावी लागणार उपकरणे
डीजी जेल म्हणाले की, अंडरट्रायल कैद्यांना तुरूंगवास हवा की जामीन असा प्रश्न विचारला जाणार आहे़ जामिन मिळवण्यासाठी ट्रॅकिंग उपकरणे अनिवार्य केली जाऊ शकतात़ सरकारला ही उपकरणे खरेदी करण्याची गरज नाही, त्याऐवजी अंडरट्रायलला जामिनाच्या बदल्यात उपकरणे खरेदी करण्यास सांगितले जाऊ शकते असे म्हटले़

Leave A Reply

Your email address will not be published.