ओडिसात २ तासांत ६१ हजार विजा पडल्याने १२ जणांचा मृत्यू – ४८ तासात मुसळधार पाऊस येणार असल्याचा इशारा

0 19

ओडिसात २ तासांत ६१ हजार विजा पडल्याने १२ जणांचा मृत्यू
– ४८ तासात मुसळधार पाऊस येणार असल्याचा इशारा

भुवनेश्वर : ओडिसा राज्यात सर्वांनाच घाबरून टाकणारी घटना घडली आहे़ यामध्ये दोन तासांत ६१ हजार वीजा कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू तर १४ जण जण जखमी झाले आहेत़ सध्या ही राज्यात वातावरणात बदल झालेला असल्याने येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे़ विशेष मदत आयुक्त सत्यब्रत शाह यांनी सांगितले की, ओडिसामध्ये एकापाठोपाठ एक ६१ हजार वीज कोसळल्या, भविष्यातही अशा घटना घडू शकतात असे आयएमडीने म्हटले आहे़
बंगालच्या उपसागरावर सक्रिय असलेले चक्रीवादळ येत्या ४८ तासात कमी दाबाच्या क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे़ यामुळे ओडिसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे़ यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे़
याविषयी एसआरसीने सांगितले की, वीज पडून ठार झालेल्यापैकी चार खुर्दा जिल्ह्यातील, दोन बालंगीर आणि प्रत्येकी एक अंगुल, बौध्द, ढेंकनाल, गजपती, जगतिसंगपूर आणि पुरी येथील आहेत़ याशिवाय गजपती आणि कंधमाल जिल्ह्यात ८ गुरेही वीज पडून मरण पावली आहेत़ वीज पडून मृत्यू झालेल्यांना चार लाख रूपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे़
ढंगाच्या टक्करामुळे अशा विजांची निर्मिती
हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले की, ही असामान्य आणि जास्त विजांची क्रिया घडते़ कारण मान्सून दीर्घ कालावधीनंतर सामान्या स्थितीत परत येतो़ थंड आणि उबदार ढंगाच्या टक्करामुळे अशा विजांची परिस्थिती निर्माण होते़

Leave A Reply

Your email address will not be published.