धर्मावर चिड असलेल्या लोकांचा काँग्रेसवर ताबा : आचार्य प्रमोद कृष्णम

0 12

धर्मावर चिड असलेल्या लोकांचा काँग्रेसवर ताबा : आचार्य प्रमोद कृष्णम

गाझियाबाद : कॉग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी हिंदू धर्म आणि काँग्रेस नेत्यांशी संबंधित केलेल्या ट्विटवरून पक्षाच्या नेत्यावर निशाणा साधला आहे़ ते म्हणाले की, काही लोकांनी पक्षात प्रवेश करून पक्ष ताब्यात घेतला आहे, जे हिंदू धर्मावर नाराज आहेत आणि ज्यांना भारत माता की जय म्हणण्याचा तिरस्कार आहे़ भारताचे तुकडे करण्याची भाषा करणाºयांना काँग्रेस पक्षात मोेठ्या पदावर घेतले आहे़ यावेळी हे नेते पक्षाला डाव्या विचारसरणीकडे घेऊन जाण्याची भीतीही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी व्यक्त केली आहे़ काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कारवायाबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले़
यावेळी कॉग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी जो पक्ष पूर्वी महात्मा गांधीच्या राम धनुच्या नावाने ओळखला जात होता, तो पक्ष आज भारत तेरे तुकडे होंगे या नावाने ओळखला जातो, ही वेदनादायक गोष्ट असल्याचे सांगितले़

Leave A Reply

Your email address will not be published.