नरसिंहानंद यांनी गरळ ओकली -डॉ़ ए़पी़जे़ अब्दुल कमाल यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावल्याने गुन्हा दाखल

0 4

नरसिंहानंद यांनी गरळ ओकली
-डॉ़ ए़पी़जे़ अब्दुल कमाल यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावल्याने गुन्हा दाखल

 

गाझियाबाद : दिल्लीच्या लगत असलेल्या गाझियाबादच्या डासना परिसरात असलेल्या शिवशक्ती धाम पीठाचे महंत आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यती नरसिंहानंद सरस्वती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणने चर्चेत असतात़ यावेळी त्यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल अशोभनीय ट्विट केल्यामुळे गाझियाबाद पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार डीसीपी देहत म्हणाले की, ७ सप्टेंबर रोजी ८ वाजता ट्विटवर १६ सेंकदाचा व्हीडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये गाझियाबादचे डासना देवी मंदिराचे मंहत नरसिंहानंद यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांच्यासाठी ‘देशद्रोही’ आणि ‘राक्षस’ असे शब्द वापरले असून ते जिहादीपेक्षा हजारो पटीने घातक आहेत़ त्याची दखल घेत जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यती नरसिंहानंद सरस्वती समाजात शांतता आणि कायदा व सुवव्यवस्था बिघडविल्याच्या आरोपावरून नरसिंहानंद यांच्याविरोधात कलम २९५ ए, ५०५ (१) सी आणि ६७ आयटी कायद्यान्वये वेव्ह सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
व्हायरल व्हीडिओ १० वर्षे जुना
याविषयी नरसिंहानंद यांनी सांगितले की, हा सुमारे १० वर्षे जुना व्हीडिओ आहे़ पुन्हा पुन्हा व्हायरल केला जात आहे़ यापुर्वीही या व्हीडिओमुळे तीन गुन्हे दाखल आहेत़ आता पुन्हा तो व्हीडिओ व्हायरल झाला आहे़ हा व्हीडीओ वारंवार व्हायरल करून जे लोक याला द्वेष मानतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले़

 

Leave A Reply

Your email address will not be published.