निकृष्ट दर्जाची स्टेनलेस स्टीलची भांडी होणार गायब – सरकारचा मोठा निर्णय

0 6

निकृष्ट दर्जाची स्टेनलेस स्टीलची भांडी होणार गायब
– सरकारचा मोठा निर्णय

 

नवी दिल्ली : स्वयंपाकाची भांडी किंवा ताट, वाट्या, ग्लास आणि इतर स्टीलची भांडी यांच्या गुणवत्तेकडे कधी आपले लक्ष जात नाही़ यातील काही भांडी दोन तीन वर्षात फुटू लागतात़ यावर आता नियंत्रण ठेवले जाणार आहे़ केंद्र सरकारच्या पुढाकाराने या दिशेने काम सुरू झाले आहे़
याविषयी ब्युरो आॅफ इंडियन स्टँडर्डस या केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या संस्थेने अलीकडेच स्टेनलेस स्टीलच्या गुणवत्तेशी संबंधित एक नवीन मानक निश्चित तयार केले आहे़ यासाठी आयएस १५९९७ हे असणार आहे़ यातून स्टेनलेस स्टीलचे वर्गीकरण एन५, एन ६ आणि एन७ या तीन गटात केले जाणार आहे़ हे विशेषत: स्वयंपाकघरात वापरल्या जाणाºया भांड्यांसाठी असणार आहे़ अन्न आणि आरोग्य व स्वच्छता यासारख्या महत्वाच्या गोष्टी असल्याने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे़
देशातील स्टेनलेस स्टील उत्पादक कंपनी जिंदाल स्टेनलेसचे कॉर्पोरेट अफेयर्सचे संचालक विजय शर्मा म्हणतात की, भांड्याच्या गुणवत्तेचा स्वयंपाकावर परिणाम होतो़ उच्च गुणवत्तेची भांडी केवळ स्वादिष्ट पदार्थच शिजवू शकत नाहीत, तर स्वयंपाकींना स्वयंपाकाचा आनंद देखील देतात़ सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे़ यामुळेच जिंदाल स्टेनलेसने या नवीन श्रेणींमध्ये उत्पादन करण्यासाठी बीआयएस कडून प्रमाणपत्र मिळवले आहे, असे सांगितले़

हा निर्णय  एक सकारात्मक पाऊल
याविषयी अभ्युदय जिंदाल, एमडी जिंदाल स्टेनलेस म्हणतात की, भांड्यांसाठी या नवीन श्रेणींचा समावेश करण्याचा निर्णय हा बीआयएस चे एक सकारात्मक पाऊल आहे़ ग्राहकांचे कल्याण या निर्णयाशी जोडलेले आहे़ ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्टेनलेस स्टीलसाठी भांडी क्षेत्रात बीआयएस मानकांचे पालन करणे बंधनकारक करण्याची विनंती सरकारकडे केली असल्याचेही सांगितले़

Leave A Reply

Your email address will not be published.