दाळीचे दर वाढण्याची शक्यता – कर्नाकातील मुगाला ११ हजार १ रूपये विक्रमी दर

0 2

दाळीचे दर वाढण्याची शक्यता
– कर्नाकातील मुगाला ११ हजार १ रूपये विक्रमी दर

औराद शहाजानी : लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्नाटकात पिकवलेल्या नवीन मुगाची आवक झाली आहे़ आवक झालेल्या या मुगाला ११ हजार १ रूपये एवढा विक्रमी दर मिळाला असून आजपर्यत हा सर्वात मोठा दर असल्याचे सांगितले जात आहे़ यामुळे लवकरच दाळीचे दर वाढण्याचा अंदाज र्वतवला जात आहे़
जिल्ह्यात पावसाने हजेरी उशिराने लावल्यामुळे खरिपाच्या पेरण्या लांबणीवर गेल्या़ यानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी जुलैमध्ये पेरण्या झाल्या, पण उशिरा पडलेल्या पावसामुळे मुगाचा पेरा कमी प्रमाणात झाला़ यावर्षीच्या पीक पेºयात सोयाबीनचा पेरा वाढला असून मुग उडीद यांच्या पिकपेºयात घट झालेली दिसत आहे़ त्यात आॅगस्ट महिन्यात पावस न पडल्याने शेतकºयांना मुगाचे उत्पन्न पुरेश न निघाल्याने मुगाची आवक घटली आहे़ यातच कर्नाटकात अनेक भागात मुगाचा पेरा झाल्याने तेथील मुगाची लातूर जिल्ह्यात होताना दिसत आहे़
जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती ही सीमावर्ती भागात असल्याने येथे मागिल पंधरा दिवसांपासून कर्नाटकातील मुगाची आवक होत आहे़ सुरूवातीला आवक झालेल्या मुगाला ९ हजार रूपये एवढा दर मिळाला होता़ परंतू जिल्ह्यातील मुगाची आवक न झाल्याने याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून यांचा दर ११ हजार १ रूपये एवढा झाला आहे़
११७ पोपटी मुग तर १५ क्विंटल चमकी मुगाची आवक
मंगळवार रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झालेल्या मुगात पोपटी व चमकी मुग आहे़ या मुगाला प्रति क्व्ािंटल ११ हजार १ रूपये एवढा दर मिळाला आहे़ या बाजार समितीमध्ये ११७ क्विंटल पोपटी व १५ क्विंटल चमकी मुग आवक झाला असल्याची माहिती बाजार समितीचे निरीक्षक चंद्रपाल कांबळे यांनी सांगितले़
दाळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता
गेल्या दोन महिन्यापासून दाळीच्या दारात वाढ होत आहे़ यात तूरडाळीचा दर घाऊक व्यावसायिकांसाठी १६५ ते १७० रूपयापर्यंत गेला आहे़ याच तुरडाळीचा किरकोळ दर १८० किलो आहे़ यापाठोपाठ मुगाच्या वाढत्या दरवाढीमुळे याच्या दाळीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.