स्टॅलिन आणि मौर्या सारखे क्षुद्र मानव सनातन संपवू शकणार नाहीत – भाजप नेत्या अपर्णा यांचा घणाघात

0 6

स्टॅलिन आणि मौर्या सारखे क्षुद्र मानव सनातन संपवू शकणार नाहीत
– भाजप नेत्या अपर्णा यांचा घणाघात

 

लखनौ : सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यावरून देशभर गोंधळ उडाला आहे़ याविषयी बोलताना भाजप नेत्या अपर्णा यादव यांनी द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर घणाघाती टीका केली़ यावेळी त्यांनी सनातन धर्मावर भाष्य करणे म्हणजे आपल्या पूर्वजांना शिव्या देणे आहे, असे म्हणणारे लोक इतर देशात असते तर ते देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात गेले असते़ तसेच स्वामी प्रसाद मौर्या यांच्याबद्दल बोलताना यादव म्हणाल्या की, असे क्षुद्र मानव सनातन धर्माला कधीही नष्ट करू शकणार नाहीत़
द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सतानत धर्म म्हणजे डेंगू मलेरियासारखा असून याचा नायनाट करावा लागेल असे वक्तव्य केले होते़ यामुळे त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे़ यावर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे़ याविषयी भाजप नेत्या अपर्णा यादव यांनीही याबाबत उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर हल्ला चढवला आहे़ यावेळी त्यांनी मी उदयनिधी यांना विचारते की, तुम्ही एक प्रकारे तुमच्या पूर्वजांना शिवीगाळ करत आहात का ? तुम्ही जे इतर कोणत्याही देशात बोलले असते तर तुम्हाला देशद्रोही ठरवले असते असे म्हटले़
यावेळी भाजप नेत्या अपर्णा यादव यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना विनंती करताना म्हटले की, सावधपणे बोला आणि तुम्ही राजकारणात चमकण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्मावर भाष्य करू नका, ही माझी विनंती आहे़ तसेच मौया यांच्यावर बोलताना यादव म्हणाल्या की, स्वामी प्रसाद मौर्या यांनी आपले स्थान गमावले आहे़ सनातनचा नाश कोणी करू शकत नाही आणि इतके क्षुद्र मानव कधीच त्याचा नाश करू शकणार नाहीत, हा त्याचा संकोच दिसून येतो़ राजकीय नेत्याने धर्मावर भाष्य करणे टाळावे कारण भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, असेही यादव यांनी म्हटले़

Leave A Reply

Your email address will not be published.