राज्यात लातूरचे १३०० विद्यार्थी मेडिकल ला – एकूण टक्केवारीच्या २० टक्के प्रमाण

0 5

राज्यात लातूरचे १३०० विद्यार्थी मेडिकल ला
– एकूण टक्केवारीच्या २० टक्के प्रमाण

लातूर : शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया लातूर जिल्ह्याने वैद्यकिय शिक्षणात आपला डंका वाजवला आहे़ लातूर बोर्डाच्या अंतर्गत येणाºया व नीट केंद्रावरून परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमधून सुमारे १३०० विद्यार्थी शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्तेनुसार पात्र ठरले आहेत़ हा प्रवेशाचा आकडा हा एकूण संख्येच्या २० टक्के एवढा आहे़
वैद्यकीय महाविद्यालयाची दुसरी प्रवेश फेरी पूर्ण झाली असून यात पुढची प्रवेश फेरीहोईपर्यंत जवळपास १५०० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ सीईटी सेलच्या आकडेवारीवरून लातूर बोर्डाचे जिल्ह्यातून ५८० विद्यार्थी पात्र ठरले आहेत़ याशिवाय लातूरच्या नीट केंद्रावरून आणि लातूर बाहेरील केंद्रावरून जे विद्यार्थी केवळ लातूर शहरात नीटची तयारी करण्यासाठी येथे आले होते़ यांचा या आडेवारीत समावेश आहे़ याशिवाय कौन्सिलर सचिन बांगड म्हणाले की, राज्यातील प्रत्येक पाच विद्यार्थ्यांमागे वैदकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमागे लातूरचा एक विद्यार्थी आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही़ वैद्यकीय प्रवेशाला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी सत्तर टक्के मुले ही लातूरच्या नीट केंद्रावरून परिक्षा दिलेली आहेत, तर ३० टक्के विद्यार्थी बाकीच्या परिक्षा केंद्रावरून परिक्षा दिलेले असले तरी त्यांनी नीटची तयारी लातूरमध्ये केलेली आहे असे सांगितले़
संख्या आणखी वाढू शकेल
शहरातील कौन्सिलर सचिन बांगड यांनी केलेल्या विश्लेषणावरून लातूरमधून शिक्षण घेऊन मेडिकलला लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३०० च्या वर आहे़ प्रवेश प्रक्रिया अंतिम होईपर्यंत तो आकडा आणखी दोनशे ने वाढण्याची शक्यता आहे असे सांगितले़
राज्यातील बोर्ड परिक्षा व जिल्ह्यानूसार पात्र विद्यार्थी प्रवेशित विद्यार्थी
पुणे ७३९
मुंबई ६०८
लातूर ५८०
ठाणे ४४८
अहमदनगर ४३८
नागपूर ४३५
नांदेड ३६२
सोलापूर ३४८
अकोला ३०५
छ़संभाजीनगर २८०

 

Leave A Reply

Your email address will not be published.