हरियाणातील मजुराच्या खात्यावर जाम झाले २०० कोटी रूपये -रक्कम पाहून कुटुंबाला धक्का

0 3

हरियाणातील मजुराच्या खात्यावर जाम झाले २०० कोटी रूपये
-रक्कम पाहून कुटुंबाला धक्का

चरखी दादरी : हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील आठवी पास मजुराच्या बँक खात्यात कोणीतरी २०० कोटी रूपये जमा केले़ आपल्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम पाहून या मजूराला आणि त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे़ ही रक्कम कोणी आणि का जमा केली याचे कुटुंबाला आश्चर्य वाटत आहे़
चरखी दादरी जिल्ह्यातील घडलेला प्रकार पोलिसांच्या कानावर येताच त्यांनी गावाला भेट दिली़ यावेळी संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली असून फसवणूक झाल्याची भीती व्यक्त करत सुरक्षिततेची विनंती केली आहे़ यामुळे या मजुराने पंतप्रधान, मुख्यमंत्री, डीजीपी यांच्यासह इतर अधिकाºयांकडे ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे़ तर पोलिस अधिकाºयांना मेलद्वारे आॅनलाईन एफआयआर पाठवून त्यांची प्रत पोलिसांनाही पाठवली आहे़ मात्र याविषयी जिल्हा पोलिसांना विचारले असता यांच्याकडून या घटनेवर बोलण्यास नकार दिला आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.