१५ तुरूंगामध्ये कॉल ब्लॉकिंग सिस्टम टॉवर बसवणार -बेकायदेशीर कॉल्स रोखण्यासाठी बिहार सरकारचा निर्णय

0 3

१५ तुरूंगामध्ये कॉल ब्लॉकिंग सिस्टम टॉवर बसवणार
-बेकायदेशीर कॉल्स रोखण्यासाठी बिहार सरकारचा निर्णय

 

पाटणा : बिहार सरकारने तुरूंगाची सुरक्षा वाढवणे आणि फोन कॉल्सवर बंदी घालण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे़ आता कारागृह परिसरातून होणारे बेकायदेशीर फोन रोखण्यासाठी राज्यातील १५ कारागृहांमध्ये हार्मोनियस कॉल ब्लॉकिंग सिस्टीम टॉवर बसवण्याचा म्हत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे़
राज्यातील इतर कारागृहामध्ये हार्मोनियस कॉल ब्लॉकिंग सिस्टीम बसवण्यात येणार आहे़ यामुळे बेकायदेशीर कॉलला आवर घालण्यासाठी सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्याती बसणारे टॉवर हे सेंट्रल जेल बेऊर पाटणा, सेंट्रल जेल बक्सर, सेंट्रल जेल मोतिहारी मध्ये बसवले जाणार आहेत़ याशिवाय शहीद खुदीराम बोस सेंट्रल जेल मुझफफरपूर, सेंट्रल जेल पूर्णिया, शहीद जुब्बा साहनी सेंट्रल जेल भागलपूर येथे ही टॉवर बसवले जाणार आहेत़
याविषयी एस सिध्दार्थ म्हणाले की, यासोबतच राज्यातील १५ तुरूंगामध्ये हार्मोनियस कॉल ब्लॉकिंग सिस्टीम टॉवर बसवण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे़ यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे़ यामुळे कारागृह परिसरातून अनधिकृत फोन कॉल्सला आळा बसणार आहे़ हे टॉवर बसण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल असे सांगितले़

 

Leave A Reply

Your email address will not be published.