जगात कर्करोगाचा कहर ८० टक्क्यांनी वाढ, ५० वर्षांखालील लोक असुरक्षित असल्याचे तज्ञांचे मत

0 95

जगात कर्करोगाचा कहर
८० टक्क्यांनी वाढ, ५० वर्षांखालील लोक असुरक्षित असल्याचे तज्ञांचे मत

 

एडिनबर्ग : कर्करोगाने तरूणाईला सातत्याने बळी बनवले असून यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे़ या अभ्यासानूसार ५० वर्षांखालील कर्करोगाच्या रूग्णांची संख्या तीन दशकात ८० टक्क्यांनी वाढली आहे़ कर्करोगाचे जागतिक रूग्ण १९९० मध्ये १८़२ लाख होते ते आता ३२़६ लाख झाले आहेत़ यात ४० व ३० किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील लोकांमध्ये कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण २७ टक्क्यांनी वाढले आहे़
तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, ५० वर्षांखालील दहा लाखांहून अधिक लोक दरवर्षी कर्करोगाने मरत आहेत़ सध्याच्या अभ्यासाचे नेतृत्व स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठ आणि चीनमधील हांगझोऊ येथील झेजियांग युनिव्हर्सिटी स्कूल आॅफ मेडिसिन यांनी केले आहे़ या अभ्यासात संशोधकांनी २०४ देशांमधील २९ प्रकारच्या कर्करोगाच्या डेटाचे विश्लेषण केले आहे़
१९९० पासून आतापर्यंत बदल शोधण्यासाठी संशोधकांनी १४ ते ४९ वर्षे वयोगटातील सर्व लोकांमधील नवीन प्रकरणे, मृत्यू आणि आरोग्यावरील परिणामांसाठी जोखीम घटक पाहिले आहेत़ यात २०१९ मध्ये ५० वर्षांखालील लोकांमध्ये कर्करोगाच्या एकूण नवीन रूणांची संख्या ३२़६ लाख होती़ ती आताच्या आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण ७९ टक्क्यांनी वाढले आहे़ स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे़ यात आतापर्यंत कर्करोगामुळे १०़०९ लाख लोकांचा मृत्यू झाला, जो १९९० च्या तुलनेत २७ टक्के जास्त आहे़
कर्करोग होण्यामागची कारणे
तज्ज्ञांकडून कर्करोग होण्यामागची करणे शोधली जात असून ते याच्या सुरूवातीच्या टप्यात आहेत़ बीएमजे आॅन्कोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे लेखक म्हणतात की, खराब आहार, अल्कोहोल आणि तंबाखूचा वापर, शारीरिक निष्क्रियता आणि लठ्ठपणा ही कारणे आहेत़

 

Leave A Reply

Your email address will not be published.