बजरंग सोनवणे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा – ज्योती मेटेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

0 31

बजरंग सोनवणे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा
– ज्योती मेटेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

बीड : बीड लोकसभा निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच ज्योती मेटे या लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची माहिती ज्योती मेटे यांनी माध्यमांना दिली होती. त्यानंतर ही निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या तुतारी चिन्हावरून लढणार अशी चर्चा जोर धरू लागली. मात्र शरद पवार यांनी ज्योती मेटे यांना नाकारून बीडची उमेदवारी बजरंग सोनवणे यांना दिली. त्यानंतर ज्योती मेटे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांनी या लोकसभेतूनच माघार घेतल्याचे जाहिर केल्याने बजरंग सोनवणे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

मी जात कधीही काढणार नाही – पंकजा मुंडे यांचा सुर नरमला

राजकीय पक्ष; अंधभक्त निर्मीतीचे कारखाने ! नवनाथ दत्तात्रय रेपे

शृंगारेंच्या बुलेट ट्रेनने थेट बावनकुळेंचे सुळे काढले – भाजप उमेदवार सुधारक शृंगारे यांच्या भाषणाची राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा
शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर या मतदार संघात ज्योती मेटे सक्रिय होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी मेटे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केली. यासाठी बैठका झाल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरविले. त्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या भेटीगाठीनंतर ज्योती मेटे या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. मात्र त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिली.
शिवसंग्रामची भूमिका स्पष्ट करू
बजरंग सोनवणे यांच्या नावाची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर ज्योती मेटे या कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र यात शिवसंग्रामची कोणतीही भूमिका पाहायला मिळाली नाही. त्यामुळे ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून मी माघार घेत आहे, असे जाहिर केल्याने या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्रामचा नेमका कोणाला पाठिंबा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर पक्ष आणि पक्षश्रेष्ठी एकत्रित येऊन निर्णय घेऊ आणि त्यानंतर आमचा निर्णय स्पष्ट करू, अस्े मेटे यांनी सांगितले.

ओबीसी नेत्यांनी आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी – मराठा आरक्षणाला विरोध करणाºया नेत्यांवर मनोज जरागेंचा घणाघात

उपोषण करून काहीही मिळत नाही – पंकजा मुंडे यांंच्या वक्तव्यांचा नेटकºयांकडून जाहीर निषेध

राज्यात मराठ्यांच्या भीतीने लोकसभेचं पाच टप्यात मतदान – मनोज जरांगे पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल

Leave A Reply

Your email address will not be published.